Metal Stocks वॉशिंग्टन : भारतीय शेअर बाजार हिंदुस्तान कॉपर, सेल, टाटा स्टील, जिंदाल स्टेनलेस, वेदांता आणि एनएडीसीसह मेटल शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. मेटल स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाली, याशिवाय गुंतवणूकदारांनी या कंपन्यांचे स्टॉक्स मोठ्या विकले आहेत. या घसरणीला डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून तांब्यावर लादण्यात येत असलेलं टॅरिफ हे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच स्टील आणि अॅल्युमिनिअमवर यापूर्वी 50 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. आता तांब्यावर देखील 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प इतर वस्तूंवर देखील कर आकारु शकतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमधील देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि विदेशातून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तांब्यावर 50 टक्के टॅरिफ लावण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. अमेरिकेत सध्या त्यांना लागणाऱ्या तांब्यापैकी किमान 50 टक्क्यांहून अधिक तांबे आयात केलं जाते. अमेरिका प्रामुख्यानं सर्वाधिक तांबे चिली देशातून आयात करते. व्हाईट हाऊसमधेय कॅबिनेट बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, आज आप तांब्यावर चर्चा करत आहोत. माझ्या मते तांब्यावर टॅरिफ 50 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहोत, असं ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे टॅरिफ कधीपासून लागू होणार हे स्पष्ट केलं नाही. आज मेटल स्टॉक्समध्ये हिंदुस्तान कॉपरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. हा स्टॉक 3.5 टक्क्यांनी घसरुन 264 रुपयांवर आला आहे. सेल कंपनीचा स्टॉक 2.35 टक्क्यांनी घसरुन 131.82 रुपयांवर आला आहे. टाटा स्टील, जिंदाल स्टेनलेस , वेंदांता, एनएडीसी, हिंडाल्को इंडस्ट्रीज, हिंदुस्तान जिंक आणि जिंदाल स्टील अँड पॉवरसह इतर मेटल स्टॉक्समध्ये 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
फेब्रुवारीत डोनाल्ड ट्रम्प यांनी तांब्यावर टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. तेव्हापासून जागतिक व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर धातूंची निर्यात अमेरिकेला केली आहे. टॅरिफ लावण्यापूर्वीच अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली, टॅरिफ पासून वाचण्यासाठी या मार्गाचा वापर करण्यात आला होता.
तांब्यावर लादण्यात येणारं 50 टक्के टॅरिफ अपेक्षेपेक्षा जास्त आहे. हे टॅरिफ येत्या काही आठवड्यांमध्ये लागू होऊ शकतं. मंगळवारी कॉमेक्सवर तांब्याच्या दरामध्ये 17 टक्के वाढ झाली आहे.यापूर्वी तांब्याच्या दरातील वाढ 10 टक्के इतकी होती. बुधवारी यामध्ये 4 टक्के घसरण झाली. एलएमईवर मेटल 2.4 टक्क्यांनी घसरले, सिंगापूरमध्ये मध्येही याचा परिणाम दिसून आला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)