Direct Tax Collection : देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात वाढ झाल्याने सरकारी तिजोरीत भर पडली आहे. आयकर विभागाच्या (Income Tax Department) आकडेवार नुसार, 1 एप्रिल ते 9 ऑक्टोबर या काळात प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये कर संकलनात 18 टक्क्यांची वाढ झाली असून 11.07 लाख कोटी रुपयांची भर सरकारी खजिन्यात पडली आहे. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार 1 एप्रिल 2023 ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत करदात्यांना 1.50 लाख कोटी रुपयांचा परताना देण्यात आला आहे.


सरकारच्या तिजोरीत भर


वित्त मंत्रालयाने कर संकलनात संदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्ष 2023-24 साठी 1 एप्रिल 2023 ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत एकूण प्रत्यक्ष कर संकलन 11.07 लाख कोटी रुपये झालं आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील कर संकलनाच्या तुलनेत 17.95 टक्क्यांची वाढ झाली आहे. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2023 ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत करदात्यांना 1.50 लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.






प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ


प्रत्यक्ष कर संकलनाच्या आकडेवारीनुसार, परतावा वगळता एकूण प्रत्यक्ष कर संकलन 9.57 लाख कोटी रुपये आहे. हे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 21.82 टक्के जास्त आहे. प्रत्यक्ष कर संकलनाचा आकडा 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 52.50 टक्के आहे. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एकूण महसूल संकलनात कॉर्पोरेट आयकर वाढीचा दर 7.30 टक्के आहे, तर वैयक्तिक आयकर दर 29.53 टक्के आहे, तर वैयक्तिक आयकरात, सुरक्षा व्यवहार कर 29.53 टक्के आहे. यानुसार, एकूण वैयक्तिक आयकर संकलनाचा वाढीचा दर 29.08 टक्के आहे.


करदात्यांना 1.50 लाख कोटी रुपयांचा परतावा


परतावा सामील केल्यास, कॉर्पोरेट आयकर (CIT) संकलनाचा वाढीचा दर 12.39 टक्के आहे. तर, वैयक्तिक आयकरात परतावा समाविष्ट केल्यानंतर, वैयक्तिक आयकराचा वाढीचा दर 32.51 टक्के आहे. यात STT जोडल्यास आयकर वाढीचा दर 31.85 टक्के आहे. प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2023 ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत करदात्यांना 1.50 लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


RBI : देशातील 'या' मोठ्या सरकारी बँकेवर आरबीआयची कारवाई; लाखो ग्राहकांवर होणार परिणाम