Demat Accounts: सीडीएसएल ही पहिली आणि एकमेव सूचीबद्ध डिपॉझिटरी कंपनी ठरली आहे, जिने 6 कोटी सक्रिय डीमॅट खाती उघडण्याचा विक्रम केला आहे. कोरोनाच्या काळात आणि नंतरही अनेकांचा कल शेअर बाजाराकडे वळला आहे. या दरम्यान अनेक नवीन गुंतवणूकदार शेअर बाजारात सामील झाले आणि त्यासाठी त्यांनी त्यांचे नवीन डिमॅट खाते उघडले.


सध्या अनेक ऑनलाइन ब्रोकरेज फर्म आहेत, जिथे नवीन गुंतवणूकदार कागदोपत्री कामाशिवाय सहजपणे त्यांचे डीमॅट खाते उघडू शकतात. डिपॉझिटरीज अंतर्गत डिमॅट खाती उघडली जात असली तरी, यामध्ये सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड (CDSL) आणि नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड (NDSL) यांचा समावेश आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेडने आतापर्यंत 6 कोटी (60 दशलक्ष) सक्रिय डीमॅट खाती उघडून एक नवीन विक्रम केला आहे. कंपनीने मीडिया प्रेस रिलीज जारी करताना या रेकॉर्डची माहिती दिली आहे.


गुंतवणूकदारांचे आभार
सीडीएसएल मधील भागधारकांबद्दल बोलायचे तर त्यात प्रामुख्याने बीएसई, स्टँडर्ड चार्टड बँक, PPFAS म्युच्युअल फंड, एचडीएफसी बँक आणि एलआयसी यांचा समावेश होतो. आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांचे आम्ही विशेष आभार मानू इच्छितो असं नेहल बोरा, एमडी आणि सीईओ, सीडीएसएल यांनी या विशेष प्रसंगी सांगितले, आमच्या डिजिटल सेवेच्या मदतीने आम्ही प्रत्येक गुंतवणूकदाराला स्वावलंबी गुंतवणूकदार बनवण्याच्या दिशेने पावले टाकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला


सीडीएसएल व्हेंचर्स लिमिटेड
ही सीडीएसएलची उपकंपनी आहे आणि देशातील पहिली आणि सर्वात मोठी KYC नोंदणी संस्था आहे. ही कंपनी, AMFI च्या सहकार्याने, म्युच्युअल फंडांसाठी KRA (KYC नोंदणी संस्था) प्रणालीची रचना आणि अंमलबजावणी करते.


सीडीएसएल इन्शुरन्स डिपॉजिटरी लिमिटेड
या कंपनीला देशातील विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कडून नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाले आहे, ज्याच्या मदतीने ही कंपनी मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमा भांडार म्हणून काम करते.


सीडीएसएल कमोडिटी डिपॉजिटरी लिमिटेड
या सुविधेमुळे शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना आणि उत्पादक यांना इलेक्ट्रॉनिक गोदामाच्या पावत्या डिमॅट खात्यात ठेवता येतात. या पावतीच्या बदल्यात कोणतीही वस्तू जमा करता येते.


संबंधित बातम्या: