मुंबई : नवीन वर्षात नवीन घर घायचे आहे का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमचे नवीन घर घेण्याचे स्वप्न या वर्षी नक्कीच पूर्ण होऊ शकते. या आठवड्यापासून दिल्लीमध्ये फ्लॅटच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. डीडीए अर्थात दिल्ली विकास प्राधिकरण (Delhi Development Authority) यंदाच्या  वर्षात 2 हजार आलिशान फ्लॅट्सची नवीन योजना घेऊन येत आहे.


या योजनेच्या माध्यमातून तुम्ही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर वेगवेगळ्या भागात फ्लॅट खरेदी करू शकतात. शुक्रवार दि. 5 जानेवारी 2024 पासून 2 हजार आलिशान फ्लॅट्सचा ई-लिलाव सुरु होणार आहे. या ई-लिलावातून तुम्ही तुमचे मनपसंद घर कसे शोधू शकतात. याबाबत आम्ही तुम्ही आज माहिती देणार आहोत. मग जाणून घेऊयात.  


'या' घटकांसाठी आहे योजना


यापैकी बहुतांश फ्लॅट हे उत्कृष्ट उत्पन्न गट (Super HIG), उच्च उत्पन्न गट (HIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) फ्लॅट्स आहेत. हे सर्व सदनिका आर्थिक दुर्बल वर्गासाठी नाहीत. यातील बहुतेक सदनिका द्वारका 19 बी, द्वारका सेक्टर-14, लोकनायक पुरम येथे आहेत. डीडीएने या सदनिकांची किंमत एक कोटींपासून अडीच कोटींवर ठेवली आहे. या सदनिकांच्या अग्रिम रकमेबद्दल बोलायचे झाले तर अग्रिम रक्कम १० लाखांवरून २० लाखांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.


ई-लिलावाद्वारे करा फ्लॅट खरेदी


5 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ई-लिलावाच्या ज्यांनी बोली लागणार नाही त्यांना 30 दिवसांच्या आत त्यांची रक्कम परत केली जाईल. अर्जदारांनी जमा केलेली अग्रिम रक्कम फ्लॅटच्या एकूण किमतीमध्ये समाविष्ट केली जाईल. यशस्वी अर्जदारांना मागणी पत्र जारी केल्यापासून ६० दिवसांच्या आत आणि ९० दिवसांच्या आत १० टक्के व्याजासह रक्कम जमा करण्याची परवानगी मिळणार असल्याचे डीडीएने म्हटले आहे. 


आतापर्यंत विकली 40 हजार घरं  


विशेष म्हणजे 2023 पासून डीडीएने फ्लॅट विकण्याची पद्धत बदलली आहे. डीडीएने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आता विक्री सुरू केली आहे. याअंतर्गत, डीडीएने आतापर्यंत सुमारे 40 हजार घरं विकली आहेत. डीडीएला नवीन वर्ष 2024 मध्येही हीच रणनीती कायम ठेवायची असल्याने ही योजना आखण्यात आली आहे. डीडीए 2024 मध्ये आणखी अनेक योजना आणण्याच्या तयारीत आहे. ज्यात हजारो फ्लॅटचाही समावेश असेल.


इतर महत्वाच्या बातम्या


PM Kisan Yojana : गुड न्यूज! शेतकऱ्यांना नव्या वर्षात मोदी सरकारची भेट, पंतप्रधान किसान योजनेचा 16 हफ्ता; 'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे