Dabur Company: घरगुती ग्राहकोपयोगी वस्तू बनवणारी कंपनी डाबर इंडियाने पर्यावरण रक्षणासाठी आणि उत्पादन वितरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डाबर इंडिया कंपनी उत्पादन वितरणासाठी आपल्या पुरवठा साखळीत 100 इलेक्ट्रिक वाहनं समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे किंबहुना वाहनं समाविष्टही करुन घेतली आहेत. त्यामुळे कार्बन न्यूट्रॅलिटी प्राप्त करण्याच्या उद्दिष्टांच्या दृष्टीने प्रत्यक्ष पावलं उचलणारी पहिली कंपनी ठरणार असल्याचा डाबर इंडिया कंपनीचा दावा आहे.


डाबर इंडियाच्या ताफ्यात नवीन EVs ची पहिली तुकडी उत्तर भारतात समाविष्ट करण्यात आली आहेत आणि हरियाणाच्या सोनीपत परिसरात डिलिव्हरी सुरू केली आहे. डाबर इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित मल्होत्रा यांनी 100 ईव्ही 12 महिन्यांत समाविष्ट होतील असा दावा केला आहे. या निर्णयामुळे दरवर्षी कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होईल असं कंपनीचं म्हणणं आहे.


पर्यावरणाचे रक्षण करण्यावर आणि हरित भारताला चालना देण्यावर भारत सरकारच्या 'फोकस'च्या अनुषंगाने, डाबरने पारंपारिक इंधनावर चालणारी वाहने बदलून इलेक्ट्रिक वाहनांचा समावेशासाठी पुढाकार घेतला आहे, ज्यामुळे उत्सर्जन कमी होईल आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल. पारंपारिक इंधन वाहने बदलण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने हा एक आदर्श उपाय आहे कारण ही वाहनं ऊर्जा-कार्यक्षम, हिरवीगार आणि पर्यावरणपूरक आहेत असंही मल्होत्रा यांनी म्हटलं.


“वाहनांचे उत्सर्जन हे प्रदूषणात सर्वात मोठे योगदान देणारं आहे आणि ईव्ही हे भविष्यातील प्रदूषणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीच नाही तर एक राष्ट्र म्हणून आपला कार्बन फूटप्रिंट देखील कमी करतात. FMCG उद्योगात कमी उत्सर्जन वाहतूक चालवण्यात पुढाकार घेणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे ” असं डाबर इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक- ऑपरेशन्सचे  शाहरुख ए खान म्हणाले.


डाबर, भारतातील आघाडीच्या FMCG कंपन्यांपैकी एक, सुमारे 138 वर्षांपासून आहे. डाबर च्यवनप्राश, डाबर हनी, डाबर हनीटस, डाबर पुदिन हारा आणि डाबर लाल टेल हेल्थकेअर क्षेत्रात, डाबर आमला, वाटिका आणि डाबर रेड पेस्ट वैयक्तिक काळजी विभागात; आणि अन्न आणि पेय श्रेणीतील रिअल ही त्याची काही लोकप्रिय उत्पादने आहेत.