Crypto Currency Price : शुक्रवारी, क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात मोठी घसरण झाली. जागितक क्रिप्टोकरन्सीचा मार्केट कॅप हा जवळपास 4.4 टक्क्यांनी घसरून 1.63 ट्रिलियन डॉलर इतका झाला. शुक्रवारी मार्केट कॅपमध्ये घट झाली असली तरी बिटकॉइन आणि इथेरियम या क्रिप्टोकरन्सीच्या दरात मोठी वाढ झाली. 


इथेरियम आणि सोलाना या क्रिप्टो करन्सीच्या दरात जवळपास 8 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्याशिवाय, अवाला टेरा लूना  (Terra – LUNA) , एवलांच (Avalanche – AVAX) आणि पोल्काडॉट  (Polkadot) या क्रिप्टो चलनाचे दर चांगले उसळले. 


इथेरियम एका आठवड्यात 17 टक्क्यांनी वधारला


शुक्रवारी दुपारपर्यंत बिटकॉईनचा दर हा 40 हजार डॉलरपर्यंत गेला होता. एका आठवड्यात  बिटकॉइनचा दर 3.39 टक्क्यांनी वधारला आहे. इथेरियमच्या दरात 6.41 टक्क्यांनी वाढ झाली. ही क्रिप्टोकरन्सी 2830 डॉलरच्या जवळपास ट्रेड करत होता. इथेरियमचा दरही एका आठवड्यात 17.70 टक्क्यांनी वाढला. 


क्रिप्टो चलनाच्या बाजारात बिटकॉइनचे 41.7 टक्के वर्चस्व असून त्यानंतर इथेरियमचे वर्चस्व आहे. क्रिप्टो बाजारात इथेरियमचा वाटा 17.4 टक्के आहे.


शुक्रवारच्या वृत्तानुसार, मागील 24 तासांत Qrkita Token (QRT), Bird Token (BIRD) आणि Dogecolony (DOGECO) या क्रिप्टोचलनात मोठी वाढ झाली. Qrkita Token (QRT) मध्ये मागील 24 तासांत 480.52 टक्क्यांनी वाढ झाली होती. Bird Token (BIRD)च्या दरात जवळपास 471 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. त्याशिवाय Dogecolony (DOGECO) 448.64 टक्क्यांनी वधारला.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha