Kirit Somaiya : भाजपच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय गृहसचिवांची दिल्लीत भेट घेतली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला आणि कोवीड सेंटमधील घोटाळ्याच्या प्रश्नासंदर्भात ही भेट घेण्यात आली. यावेळी पुण्यात किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच कोवीड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळ्याची देखील चौकशी करावी अशी मागणी केली आहे. याबबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील पत्र दिले आहे. याप्रकरणाची केंद्राकडून चौकशी करण्यात यावी, असे यावेळी सांगण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने संजय राऊत यांच्या बेनामी कंपनीला कोवीड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट दिले असल्याचा आरोप यावेळी सोमय्या यांनी केला. यामध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळ झाला आहे. हा घोटाळा उघड करण्यासाठी गेल्यावर शिवसेनेच्या 100 गुंडांनी माझ्यावर हल्ला केल्याचे सोमय्या यावेळी म्हणाले. याबाबत भाजपचे खासदार, गोपाळ शेट्टी, खासदार गिरीष बापट, खासदार मनोज कोटक, खासदार रक्षा खडसे आणि मी या सर्वांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. यावेळी आम्ही कोवीड घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी मिळून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. याबाबतच्या सर्व व्हिडीओ क्लिप आम्ही गृहसचिवांना दिल्या आहेत. शिवसेनेचे गुंड एकीकडे मोठ मोठे दगड मारताना असताना पोलीस काहीच करत नव्हते अस आरोप यावेळी सोमय्या यांनी केला. याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन गृहसचिवांनी दिले असल्याचे सोमय्या यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना भाजपचे कासदार मनोज कोटक यांनी देखील राज्य सरकार आणि शिवसेनेवर टीका केली. पुणे महापालिकेने रिजेक्ट केलेल्या कंत्राटदारांना राज्य सरकारने कंत्राटे दिली असल्याचा आरोप कोटक यांनी केला. यामध्ये मोठा घोटळा झाला आहे. याची चौकशी होऊ नये म्हणूनच सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांना हल्ला केल्याचा आरोप यावेळी कोटक यांनी केला. मुळात पुणे पोलीस आयुक्तांनी 100 लोकांना तिथे जमूच का दिले असा सवालही त्यांनी केला. पुणे पोलीस आयुक्तांची संरक्षणाची जबाबदारी होती असेही ते यावेळी म्हणाले. तसेच पुणे पोलीस आयुक्तांच्या बदलीसठी देखील भाजपचे नेते आग्रही आहेत. संजय राऊत यांनी केलेली वक्तव्य गंभीरतेने घेण्याची गरज नसल्याचे कोटक यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये बेवारसपणे प्रेतं फेकली नाही; संजय राऊतांचा मोदींच्या वक्तव्यावर घणाघात
- Devendra Fadnavis : 'सिंह कधी गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही', राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर