मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून आल्याने गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 786 अंकांनी वधारला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 225 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये आज 1.31 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,746 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.27 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,012 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही आज 317 अंकांची वाढ होऊन तो 41,307 अंकांवर स्थिरावला. 


शेअर बाजारात आज एकूण 1788 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1657 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 164 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


आज UltraTech Cement, Eicher Motors, M&M, HDFC आणि Sun Pharma यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर  Apollo Hospitals, Dr Reddy’s Labs, NTPC, IndusInd Bank आणि Britannia Industries यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. 


शेअर बाजारात आज जवळपास सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये एका टक्क्याची तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.5 टक्क्याची वाढ नोंद झाली आहे. 


शेअर बाजाराची सुरुवात तेजीने 


आज शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 287.11 अंकांच्या तेजीसह 60,246.96 अंकांवर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 123.40  अंकांच्या तेजीसह 17,910.20 अंकावर खुला झाला. सकाळी 10.10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 577  अंकांच्या तेजीसह 60,537.15 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 157 अंकांच्या तेजीसह 17,944.75 अंकांवर व्यवहार करत होता. 


या कंपन्यांचे शेअर्स वाढले 



  • UltraTechCement- 4.17 टक्के

  • HDFC- 2.89 टक्के

  • M&M- 2.82 टक्के

  • Eicher Motors- 2.80 टक्के

  • Sun Pharma- 2.72 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले 



  • Apollo Hospital- 1.08 टक्के

  • Dr Reddys Labs- 0.59 टक्के

  • NTPC- 0.55 टक्के

  • IndusInd Bank- 0.38 टक्के

  • Britannia- 0.30 टक्के