मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात काही अंशी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 86 अंकांची घसरण झाली आहे तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये केवळ 4 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 0.16 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,395 अंकावर स्थिरावला. तर 0.03 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,216 अंकांवर स्थिरावला. आज शेअर बाजारात 2035 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1297 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज 155 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


आज शेअर बाजार बंद होताना Eicher Motors, ONGC, Tata Steel, M&M आणि  Dr Reddy's Lab या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर  Bharti Airtel, TCS, HCL Technologies, BPCL आणि Infosys या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे. 


आज ऑटो, मेटल, ऑईल अॅन्ड गॅस, रिअॅलिटी आणि उर्जा क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 ते 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 0.5 ते 1 टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे. 


आज सुरूवातीच्या ट्रेंडमध्ये सेन्सेक्स 233.24 अंकांच्या घसरणीसह 54,248 अंकावर खुला झाला होता. तर, निफ्टी निर्देशांकात  84.45 अंकांची घसरण दिसून आली. सकाळी 9.40 वाजता सेन्सेक्स 373 अंकांच्या घसरणी 54,108.61 अंकावर ट्रेड करत होता. तर, निफ्टी 91.80 अंकांच्या घसरणीसह 16,128.80 अंकावर ट्रेड करत होता. 


आज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली



  • Eicher Motors- 3.93 टक्के

  • ONGC- 3.29 टक्के

  • Tata Steel- 3.03 टक्के

  • M&M- 2.77 टक्के

  • Dr Reddys Labs- 2.15 टक्के


आज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली



  • Bharti Airtel- 4.98 टक्के

  • TCS- 4.64 टक्के

  • HCL Tech- 4.07 टक्के

  • BPCL- 2.89 टक्के

  • Infosys- 2.73 टक्के