मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या शेअर बाजारातील तेजीला (Closing Bell Share Market Updates) आज लगाम लागल्याचं दिसून आलं आहे. शेअर बाजार बंद होताना आज मुंबई शेअर बाजाराचा (Share Market) निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 247 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 76 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,733 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 0.36 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,333 वर खाली आला.
आज शेअर बाजार (Share Market) बंद होताना निफ्टी बँकमध्ये 77 अंकांची घसरण होऊन तो 42,458 अंकावर पोहोचला. आज एकूण 1431 शेअर्समध्ये वाढ झाली तर 1880 शेअर्समध्ये घसरण झाली. आज 87 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
रुपयाच्या किमतीत घसरण
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीमध्ये 35 पैशांची घसरण झाली आहे. बुधवारी रुपयाची किंमत ही 81.30 इतकी होती. आज रुपयाची किंमत ही 81.65 इतकी आहे.
आज बाजार बंद होताना ऑटो आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये आज विक्री तर कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं. टाटा, अदानी एन्टरप्रायझेस, लार्सेन, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअर टेलच्या शेअर्समध्ये आज वाढ झाल्याचं दिसून आलं. तर टायटन एम अॅन्ड एम, टाटा मोटर्स, अपोलो हॉस्पिटल आणि आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये आज घसरण झाल्याचं दिसून आलं.
या शेअर्समध्ये वाढ झाली
- TATA Cons. Prod- 2.14
- Adani Enterpris- 1.56
- Larsen- 1.30
- ICICI Bank- 0.68
- Bharti Airtel- 0.59
या शेअर्समध्ये घसरण झाली
- Titan Company- 2.36
- M&M- 2.13
- Tata Motors- 1.95
- Apollo Hospital- 1.76
- Eicher Motors- 1.75
शेअर बाजाराची सुरुवात
बाजारात सुरुवातीच्या घसरणीनंतर पुन्हा खरेदीचा जोर दिसून आल्याने सेन्सेक्स निर्देशांक वधारला होता. त्यानंतर पुन्हा घसरण झाली. सकाळी 10.10 वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 33.39 अंकांच्या घसरणीनंतर 61,947.33 अंकांवर व्यवहार करत होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 25.50 अंकांच्या घसरणीसह 18,384.15 अंकांवर व्यवहार करत होता.