मुंबई: शेअर बाजारात आजही घसरण सुरुच असून आजही विक्रीचा जोर दिसून आला. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 168 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 31 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 0.28 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,028 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.18 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,624 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही 210 अंकांची घसरण होऊन तो 39,455 अंकांवर स्थिरावला.
अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचं दिसून आलं. दुपारच्या सत्रानंतर शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण झाल्याचं दिसून आलं. आज एकूण 2073 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1289 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. एकूण 121 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
ऑटो आणि रिअॅलिटी इंडेक्समध्ये आज विक्री झाली तर FMCG, आयटी आणि फार्मा कंपन्यांच्या इंडेक्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये अर्ध्या टक्क्यांची वाढ झाली आहे.
रुपयाची घसरण सुरूच
डॉलरच्या तुलनेत आजही रुपयामध्ये सहा पैशांची घसरण झाली असून रुपयाची किंमत 79.90 इतकी झाली आहे.
शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने
शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 407.73 अंकांची घसरणीसह 58,789.26 अंकावर खुला झाला. तर, एनएसई निर्देशांक निफ्टीमध्ये 136.20 अंकांच्या घसरणीसह 17,519.40 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 287 अंकांच्या घसरणीसह 58,909.36 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 84 अंकांच्या घसरणीसह 17,571.35 अंकांवर व्यवहार करत होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री झाली
- Shree Cements- 7.05 टक्के
- UltraTechCement- 4.24 टक्के
- Adani Ports- 2.89 टक्के
- Coal India- 2.64 टक्के
- Britannia- 1.64 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
- Tata Motors- 2.60 टक्के
- Bajaj Auto- 2.13 टक्के
- IndusInd Bank- 1.70 टक्के
- M&M- 1.28 टक्के
- Maruti Suzuki- 1.17 टक्के