मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे. शेअर बाजारातील आजचा दिवस चांगलाच अस्थिर असल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 200 अंकांची घसरण झाली आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 73 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 0.34 टक्क्यांची घसरण झाली असून तो 57,991.11 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.43 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,241 अंकावर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही 84 अंकांची घसरण होऊन तो 39,093 अंकावर पोहोचला.
सकाळच्या सत्रात शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. बाजार खुला होताच सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला. पण बाजार बंद होताना तो काहीसा सावरून घसरण 200 अंकांपर्यंत खाली आली. आज शेअर बाजार बंद होताना 1406 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 2056 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज 161 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
शेअर बाजार बंद होताना आज Tata Motors, Tata Consumer Products, Hero MotoCorp, Asian Paints आणि ITC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये काहीशी घसरण झाली. तर Axis Bank, TCS, HDFC Life, Eicher Motors आणि Maruti Suzuki या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये काहीशी वाढ झाली.
आज आयटी क्षेत्र सोडलं तर इतर क्षेत्रातल्या शेअर्समध्ये काहीशी घसरण झाली आहे. सार्वजनिक बँका, रिअॅलिटी, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एका टक्क्याची घसरण झाली आहे. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली आहे.
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 767.22 अंकांच्या घसरणीसह 57,424.07 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 220.30 अंकांच्या घसरणीसह 17,094.35 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 764 अंकांच्या घसरणीसह 57,426.95 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 234 अंकांच्या घसरणीसह 17,079.95 अंकांवर व्यवहार करत होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- Axis Bank- 2.80 टक्के
- TCS- 1.75 टक्के
- HDFC Life- 1.21 टक्के
- Maruti Suzuki- 0.95 टक्के
- Eicher Motors- 0.94 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
- Tata Motors- 3.93 टक्के
- TATA Cons. Prod- 3.04 टक्के
- Hero Motocorp- 2.07 टक्के
- Asian Paints- 1.97 टक्के
- ITC- 1.87 टक्के