मुंबई: शेअर बाजारात चढ उतार कायम आहे. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 134 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 32 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 0.25 टक्क्यांची घसरण होऊन तो 53,026 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.21 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,799 अंकांवर स्थिरावला.
आज सकाळी शेअर बाजाराची सुरवात झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली. त्यानंतर दुपारी बाजार काहीसा स्थिर झाला. आज मेटल, ऑटो, ऑईल अॅन्ड गॅस, उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली तर बँकिंग, आयटी, एमएमसीजी या क्षेत्रातल्या शेर्असमध्ये घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉल कॅपनध्येही काहीशी घसरण झाली. निफ्टीमधील 16 शेअर्समध्ये वाढ झाली तर 34 शेअर्समध्ये घसरण झाली
रुपयाची निचांकी घसरणडॉलरच्या तुलनेत रुपयाने निचांकी पातळी गाठली असून रुपयामध्ये सातत्याने घसरण सुरूच आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 78.97 इतकी आहे. मंगळवारी हीच किंमत 78.77 इतकी होती.
सुरुवात मोठ्या घसरणीनेआज शेअर बाजारात सेन्सेक्स 554.30 अंकाच्या घसरणीसह 52,623.15 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा 50 शेअरचा निफ्टी निर्देशांक 148.50 अंकांच्या घसरणीसह 15,701 अंकांवर खुला झाला होता. सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 293 अंकांच्या घसरणीसह 52,885.71 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 92 अंकांच्या घसरणीसह 15,757.50 अंकांवर व्यवहार करत होते.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ
- ONGC- 3.21 टक्के
- NTPC- 2.27 टक्के
- Reliance- 2.08 टक्के
- Coal India- 1.26 टक्के
- Sun Pharma- 1.22 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
- HDFC Life- 4.36 टक्के
- HUL- 3.63 टक्के
- Apollo Hospital- 3.24 टक्के
- Axis Bank- 2.62 टक्के
- TATA Cons. Prod- 2.29 टक्के