मुंबई: आरबीआयने आज पतधोरण जाहीर करुन व्याजदरात कोणताही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयच्या या धोरणाचा सकारात्मक परिणाम हा शेअर बाजारावर झालेला दिसून आलं आहे. सलग तीन सत्रांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात सकारात्मक स्थिती दिसून आली. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 412 अंकांनी वाढला आहे तर निफ्टीही 144 अंकानी वाढला आहे. सेन्सेक्समध्ये 0.70 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,447.18 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.82 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,784.30 वर पोहोचला आहे.
आज 2232 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1072 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 117 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक, आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी या सर्वच सेक्टरच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 1 टक्क्यांची घसरण झाली आहे.
शुक्रवारी शेअर बाजारात Grasim Industries, ITC, SBI Life Insurance, JSW Steel आणि M&M या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने आज आपले पतधोरण जाहीर केले. यंदा अपेक्षेनुसार व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल न करता तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. तर, रिर्व्हस रेपो रेट 3.75 टक्के इतका करण्यात आला आहे. सलग 11 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Grasim- 5.31 टक्के
- SBI Life Insurance- 4.65 टक्के
- ITC- 4.34 टक्के
- JSW Steel- 3.92 टक्के
- M&- 2.77 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Cipla- 2.42 टक्के
- Tech Mahindra- 1.35 टक्के
- Maruti Suzuki- 1.08 टक्के
- NTPC- 0.94 टक्के
- Sun Pharma- 0.68 टक्के
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha