मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले पतधोरण आज जाहीर केलं. त्या पार्श्वभूमीवर आज शेअर मार्केटमध्ये तेजी कायम असल्याचं दिसून आलं. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 460 अंकांनी वधारला आहे तर निफ्टीही 142 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 0.79 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,926 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.81 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,605 वर पोहोचला आहे. 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केलं. त्यांच्या घोषणेच्या आधीच शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. मुंबई शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 344 अंकांनी वधारत 58,810 अंकांवर तर निफ्टी 90 अंकांच्या तेजीने 17554 अंकावर सुरू झाला. 


आज 1491 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1761 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 103 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


आज बाजार बंद होताना जवळपास सर्वच क्षेत्राच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही वाढ झाली आहे. 


मंगळवारी शेअर बाजारात ONGC, Tata Steel, Infosys, SBI Life Insurance आणि HDFC Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  Maruti Suzuki, BPCL, Shree Cements, IOC आणि UltraTech Cement या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • ONGC- 3.14 टक्के

  • Tata Steel- 2.13 टक्के

  • Infosys- 1.86 टक्के

  • HDFC Ban- 1.84 टक्के

  • SBI Life Insurance- 1.83 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • Maruti Suzuki- 1.61 टक्के

  • BPCL- 1.58 टक्के

  • IOC- 0.91 टक्के

  • Shree Cements- 0.86 टक्के

  • UltraTechCement- 0.39 टक्के


रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर
रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले असून रेपो दरात कोणताही बदल केला नाही. पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल न करता तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे तर रिव्हर्स रेपो दर 3.35 इतका ठेवण्यात आला आहे.महागाई दर आणि वाढत्या कच्च तेलाच्या किंमती पाहता, देशांतर्गत चलनवाढीच्या स्थितीबाबत मध्यवर्ती बॅंकेच्या आकलनाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. आरबीआयकडून रिर्व्हस रेपो दरता बदल केले जातील असे म्हटले जात होते. रिझर्व्ह बँकेने येत्या आर्थिक वर्षात विकास दर 7.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha