मुंबई: मंगळवारी शेअर बाजारात (Share Market) आलेल्या तेजीला आज पुन्हा एकदा लगाम लागला आहे. आज शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 537 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 162 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.94 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,819 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.94 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,038 वर पोहोचला आहे. 

आज 1146 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2140 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 107 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना बँकिंग, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली. BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही 0.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

बुधवारी शेअर बाजारात Bajaj Finance, Bajaj Finserv, Tata Consumer Products, Adani Ports आणि ICICI Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  Hero MotoCorp, Tata Steel, Asian Paints, Bajaj Auto आणि TCS या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

घसरणीसह सुरुवातबुधवारी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. शेअर बाजारात आज प्री-ओपनिंग सत्रात, सेन्सेक्समध्ये 350 अंकाची घसरण झाली. तर, निफ्टी निर्देशांक 17100 अंकाखाली आला आहे. जागतिक शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे.  

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Hero Motocorp- 3.85 टक्के
  • Tata Steel- 1.06 टक्के
  • Asian Paints- 0.73 टक्के
  • TCS- 0.42 टक्के
  • Bajaj Auto- 0.35 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Bajaj Finance- 7.27 टक्के
  • Bajaj Finserv- 3.94 टक्के
  • TATA Cons. Prod- 2.85 टक्के
  • Adani Ports- 2.44 टक्के
  • Shree Cements- 2.28 टक्के