Share Market : सकाळी काहीशी तेजी दिसत असलेल्या शेअर बाजाराला पुन्हा उतरती कळा लागली आहे. सलग पाचव्या सत्रामध्ये शेअर बाजारात घसरण झाली असून आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 703 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 215 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.23 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,463 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.25 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,958 वर पोहोचला आहे. 16 मार्च 2022 नंतर पहिल्यांदाच निफ्टी हा 17 हजारांखाली आला आहे.
आज 1111 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2216 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 118 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑईल अॅन्ड गॅस हे क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही एका टक्क्याची घसरण झाली आहे. आयटी, उर्जा, रिअॅलिटी आणि FMCG या सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये दोन टक्क्यांची घसरण झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात HDFC, HDFC Life, SBI Life Insurance, HDFC Bank आणि Tata Consumer Products या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Apollo Hospitals, Coal India, Reliance Industries, ICICI Bank आणि BPCL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Apollo Hospital- 5.75 टक्के
- Coal India- 4.38 टक्के
- Reliance- 3.81 टक्के
- ICICI Bank- 1.12 टक्के
- BPCL- 1.10 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- HDFC- 5.45 टक्के
- HDFC Life- 4.81 टक्के
- SBI Life Insurance- 4.15 टक्के
- HDFC Bank- 3.82 टक्के
- TATA Cons. Prod- 3.76 टक्के