मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 638 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 207 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 1.11 टक्क्यांची घसरण झाली असून तो 56,788 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 1.21 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,887 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही आज 602 अंकांची घसरण होऊन तो 38,029 अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव असल्याचं दिसून आलं. जागतिक परिस्थितीचा दबाव आणि फार्मा क्षेत्राव्यतिरिक्त सर्वच क्षेत्रामध्ये झालेल्या विक्रीमुळे शेअर बाजार आज घसरला.
आज बाजार बंद होताना Adani Enterprises, Eicher Motors, Adani Ports, Maruti Suzuki आणि Tata Consumer Products या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर ONGC, Dr Reddy's Laboratories, Cipla, BPCL आणि Coal India यां कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. आज फार्मा क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रात म्हणजे निफ्टी बँक, ऑटो, उर्जा, एफएमसीजी, मेटल आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये एक ते तीन टक्क्यांची घसरण झाली.
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप मध्येही अनुक्रमे 1.2 टक्के आणि 0.54 टक्क्यांची घसरण झाली.
शेअर बाजाराची सुरुवात समिश्र
आज बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा खरेदीचा जोर दिसण्याचे संकेत दिसत होते. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात संमिश्र झाली. सेन्सेक्समध्ये किंचीत घसरण दिसून आली. बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 23 अंकांनी घसरत 57,403 अंकावर आणि निफ्टी 8 अंकांनी वधारत 17,102 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 173 अंकांच्या घसरणीसह 57,253.84 अंकावर व्यवहार करत होता. तर निफ्टी 43 अंकांच्या घसरणीसह 17,050.60 अंकांवर व्यवहार करत होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्य वाढ झाली
- ONGC- 4.42 टक्के
- Dr Reddys Labs- 1.94 टक्के
- Cipla- 1.42 टक्के
- BPCL- 1.31 टक्के
- Coal India- 1.27 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- Adani Enterpris- 8.64 टक्के
- Eicher Motors- 5.67 टक्के
- Adani Ports- 4.42 टक्के
- Maruti Suzuki- 3.18 टक्के
- TATA Cons. Prod- 3.10 टक्के