मुंबई: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर कायम असून बाजारातील घसरण आजही कायम आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 768 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 252 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,333.81 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.53 टक्क्यांची घसरण होऊन तो 34,407.80 वर पोहोचला आहे.
आज बाजार बंद होताना आयटी सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रामध्ये 2 ते 3 टक्क्यांची घसरण झाली आहे. BSE मिडकॅपमध्ये 2.3 टक्के तर स्मॉलकॅपमध्ये 1.6 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज 1204 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2075 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 96 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
शुक्रवारी शेअर बाजारात Titan Company, Maruti Suzuki, Asian Paints, Hero MotoCorp आणि Tata Motors या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Dr Reddy's Laboratories, ITC, Tech Mahindra, Sun Pharma आणि UltraTech Cement या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
बाजाराच्या सुरुवातीला घसरण
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज निर्देशांक सेन्सेक्स हा 800 हून अधिक अंकांच्या घसरणीसह खुला झाला. परिणामी निर्देशांक 55 हजारांखाली आला होता. तर निफ्टी देखील 238 अंकांनी कोसळला होता. युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारात अस्थिरतेचं वातावरण आहे. आज आशियाई शेअर बाजारही घसरण दिसत आहे. शांघाय, हँगसेंग शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.
युरोपचा शेअर बाजार कोसळला
रशियाने युरोपच्या सर्वात मोठ्या न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टचा ताबा घेतल्याचा परिणाम युरोपच्या शेअर बाजारावर झाला असून त्यामध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Dr Reddys Labs- 2.95 टक्के
- ITC- 2.78 टक्के
- Tech Mahindra- 1.89 टक्के
- UltraTechCement- 1.16 टक्के
- Wipro- 1.07 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Titan Company- 5.18 टक्के
- Asian Paints- 4.66 टक्के
- Maruti Suzuki- 4.58 टक्के
- Tata Motors- 4.54 टक्के
- Hero Motocorp- 4.39 टक्के
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha