मुंबई: शेअर बाजारात (Stock Market Updates) सकाळच्या सत्रातील तेजीला ब्रेक लागला असून शेअर बाजार बंद होताना त्यामध्ये घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 310 अंकांनी घसरला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 82 अंकांची घसरण झाली. आज शेअर बाजारात 1865 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1462 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच आज 132 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


आज शेअर बाजार बंद होताना Adani Ports, Bajaj Finance, Infosys, Power Grid Corporation आणि NTPC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Shree Cements, Hindalco Industries, Divis Laboratories, Eicher Motors आणि Grasim Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली. 


आज रिअॅलिटी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली, तर आयटी, फार्मा, बँक,ऑटो क्षेत्रातल्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये काहीशी घट झाल्याचं दिसून आलं. 


रुपया सात पैशांनी घसरला 
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच असून आजही रुपयाच्या किंमतीत सात पैशांची घसरण झाली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ही 79.88 इतकी आहे. 


शेअर बाजाराची सुरुवात तेजीने
आज शेअर बाजारातील व्यवहार (Stock Market Updates) सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 250.88 अंकांनी वधारत 59338.31 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी 69.90 अंकांनी वधारत 17674.90 अंकांवर खुला  झाला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 303  अंकांच्या तेजीसह 59,389.15 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 99 अंकांनी वधारत 17,704.60 अंकावर व्यवहार करत होता. 


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली



  • Shree Cements- 1.71

  • Divis Labs- 1.12

  • Hindalco- 0.91

  • Eicher Motors- 0.89

  • Grasim- 0.78


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली



  • Adani Ports- 2.43

  • Bajaj Finance- 1.81

  • Power Grid Corp- 1.37

  • Infosys- 1.26

  • NTPC- 1.18


महत्त्वाच्या बातम्या :