मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ  इंडियाने मोठ्या कालावधीनंतर रेपो दर आणि सीआरआर वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा परिणाम आता शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 364 अंकांनी घसरला तर निफ्टीही 109 अंकांनी घसरला. सेन्सेक्समध्ये 0.67 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,470 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.67 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,301 वर पोहोचला आहे. आज 1036 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2353 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 140 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, सार्वजिनक बँका, फार्मा आणि रिअॅलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. 

सोमवारी शेअर बाजारात Reliance Industries, Hero MotoCorp, Nestle India, IndusInd Bank आणि Tata Steel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  Power Grid Corporation, HCL Technologies, Bajaj Auto, Infosys आणि Divis Labs या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

आज शेअर बाजार सुरू झाला तेव्हा, सेन्सेक्स निर्देशाकांत  647.37 अंकाची घसरण होत 54,188.21 अंकावर खुला झाला. तर, निफ्टीत 183.55 अंकाची घसरण होऊन 16,227.70  अंकावर सुरू झाला. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Power Grid Corp- 2.83 टक्के
  • HCL Tech- 2.47 टक्के
  • Bajaj Auto- 1.97 टक्के
  • Infosys- 1.78 टक्के
  • Divis Labs- 1.57 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Reliance- 3.91 टक्के
  • Nestle- 2.89 टक्के
  • IndusInd Bank- 2.81 टक्के
  • Hero Motocorp- 2.75 टक्के
  • Tata Steel- 2.45 टक्के