मुंबई: शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली असूनही बाजार बंद होताना मात्र त्यामध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 188 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही 40 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 0.33 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,409 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.24 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,818 अंकांवर स्खिरावला. बँक निफ्टीमध्येही 112 अंकांची घसरण होऊन 37,647 अंकावर स्थिरावला. आरबीआयने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून येतंय.


आरबीआयचे पतधोरण शुक्रवारी जाहीर होणार असून त्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. आज एकूण 1775 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1435 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज 102 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


आज बाजार बंद होताना Asian Paints, Tech Mahindra, Hero MotoCorp, Bajaj Auto आणि Titan Company या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर  ONGC, ITC, Apollo Hospitals, Hindalco Industries आणि HDFC Life या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. 


आज उर्जा इंडेक्समध्ये 1.3 टक्क्यांची घसरण झाली. तर एफएमसीजी, मेटल आणि फार्मा क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एका टक्क्याची वाढ झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 0.3 टक्के ते 0.6 टक्क्यांची वाढ झाली. 


शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक 


आज बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 492.71 अंकांनी वधारत 57,090 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निफ्टी निर्देशांक 157.45 अंकांनी वधारत 17,016 अंकावर खुला झाला होता. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 419 अंकांनी वधारत 57,017.91 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 125 अंकांनी वधारत 16,984.45 अंकांवर व्यवहार करत होता. 


आज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली 



  • ONGC- 3.35 टक्के 

  • Hindalco- 2.90 टक्के

  • Apollo Hospital- 2.88 टक्के

  • HDFC Life- 2.63 टक्के

  • ITC- 2.49 टक्के


आज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली 



  • Asian Paints- 5.20 टक्के

  • Tech Mahindra- 2.19 टक्के

  • Hero Motocorp- 2.12 टक्के

  • Bajaj Auto- 1.95 टक्के

  • Titan Company- 1.76 टक्के