मुंबई: शेअर बाजारात आज सकारात्मक स्थिती असल्याचं दिसून आलं असून आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 616 अंकांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 178 अंकांची वाढ झाली आहे. बँक निफ्टीही 508 अंकांनी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 1.16 टक्क्यांची वाढ होऊन तो 53,750 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 1.13 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,750 वर पोहोचला. आज शेअर बाजार बंद होताना 1779 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1436 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. 131 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


आज शेअर बाजार बंद होताना Britannia Industries, Bajaj Finance, Bajaj Finserv, HUL आणि Eicher Motors यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तर  ONGC, Power Grid Corp, NTPC, HDFC Life आणि Hindalco Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली. ऑटो, एफएमसीजी, रिअॅलिटी, आयटी आणि बँक या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1-2 टक्क्यांची घट झाली आहे तर मेटल स्टॉकमध्ये विक्री झाली. बीएसईमध्ये 1.7 टक्के तर स्मॉलकॅपमध्ये 0.94 टक्क्यांची वाढ झाली आहे.


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली 



  • Britannia- 4.76 टक्के 

  • Bajaj Finance- 4.52 टक्के

  • Bajaj Finserv- 4.37 टक्के

  • HUL- 4.03 टक्के

  • Eicher Motors- 3.65 टक्के


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली



  • ONGC- 5.06 टक्के

  • Power Grid Corp- 1.73 टक्के

  • NTPC- 1.35 टक्के

  • HDFC Life- 1.31 टक्के



महत्त्वाच्या बातम्या: