मुंबई: शेअर बाजारात आज काहीशी अस्थिरता दिसून आली असली तरी बाजार बंद होताना त्यामध्ये सुधारणा झाली. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 156 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 57 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.27 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,222 वर पोहोचला तर निफ्टीमध्ये 0.33 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,331 अंकावर स्थिरावला. निफ्टी बँक इंडेक्समध्येही 172 अंकांची वाढ होऊन तो 39,282 वर पोहोचला. आशियाई बाजारात सकारात्मक संकेत दिसून आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात काहीशी तेजी दिसली. 


आज बाजार बंद होताना 2302 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1054 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज 126 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


आज शेअर बाजारातील FMCG आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये काहीशी घट झाली. तर मेटल, रिअॅलिटी, कॅपिटल गुड्स या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ झाली. JSW Steel, Hindalco Industries, Coal India, Tata Steel and Larsen आणि Toubro या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Bharti Airtel, HUL, HDFC, IndusInd Bank आणि Britannia Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली. 


बीएसई आणि स्मॉलकॅपच्या इंडेक्समध्ये आज एका टक्क्यांची वाढ झाली आहे. 


रुपयाच्या किमतीत 37 पैशांची घसरण 


डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीमध्ये आजही 37 पैशांची घसरण झाल्याचं दिसून आलं. बुधवारी रुपयाची किंमत ही 81.52 इतकी होती. आज रुपयाची किंमत 81.89 इतकी झाली. 


शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक 


शेअर बाजाराची सुरुवात झाल्यावर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 248.58 अंकांच्या तेजीसह 58,314 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 104.95 अंकांच्या तेजीसह 17,379 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 396 अंकांच्या तेजीसह 58,461.50 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 123 अंकांच्या तेजीसह 17,397.45 अंकावर व्यवहार करत होता. शेअर बाजारात आज गॅप अपने सुरुवात झाली. मंगळवारीदेखील बाजाराची सुरुवात गॅपने झाली होती. मंगळवारी बाजारात चांगली तेजी दिसून आली.


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली 



  • JSW Steel- 4.86 टक्के

  • Hindalco- 4.72 टक्के

  • Coal India- 4.59 टक्के

  • Tata Steel- 2.37 टक्के

  • Larsen- 2.21 टक्के


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली 



  • Bharti Airtel- 2.49 टक्के

  • HUL- 2.02 टक्के

  • IndusInd Bank- 1.51 टक्के

  • HDFC- 1.42 टक्के

  • Britannia- 1.33 टक्के