मुंबई: सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारात वाढ झाली असून आजही गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल असल्याचं दिसून आला. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 284 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 84 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.51 टक्के वाढ होऊन तो 55,681 वर स्थिरावला तर निफ्टीमध्येही 0.51 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,605 वर पोहोचला. आज 1950 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1302 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. 155 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज शेअर बाजार बदं होताना IndusInd Bank, Bajaj Finance, Tata Consumer Products, UPL आणि Bajaj Finserv या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Dr Reddy's Laboratories, Kotak Mahindra Bank, SBI Life Insurance, Cipla आणि Tech Mahindra कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली.
फार्मा क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रांमधील शेअर्स वधारले असून सार्वजनिक बँका, ऑईल अॅन्ड गॅस,कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 1.2 टकक्यांची वाढ झाली आहे, तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.9 टक्क्यांची वाढ झाली.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आज काहीशी वधारली असून रुपयाची किंमत आज 79.95 इतकी आहे.
सत्राची सुरुवात काहीशा अस्थिरतेने
आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स निर्देशांक 5.60 अंकांनी घसरत 55,391.93 अंकांवर खुला झाला. तर. निफ्टी निर्देशांक 2.70 अंकांनी वधारत 16,523.55 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 6.84 अंकांच्या घसरणी 55,390.69 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 7.65 अंकांनी वधारत 16,528.50 अंकांवर व्यवहार करत होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
IndusInd Bank- 7.82 टक्के
Bajaj Finance- 3.17 टक्के
TATA Cons. Prod- 2.93 टक्के
UPL- 2.73 टक्के
Bajaj Finserv- 2.38 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
Dr Reddys Labs- 1.97 टक्के
Kotak Mahindra- 1.49 टक्के
SBI Life Insura- 1.48 टक्के
Cipla- 1.32 टक्के
Tech Mahindra- 1.22 टक्के