मुंबई: शेअर बाजारातील आठवड्याचा शेवट हा देखील घसरणीने झाला आहे. आज सलग सहाव्या सत्रात घसरण झाली असून शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 136 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 25 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.26 टक्क्यांची घसरण होऊन तो 52,793 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.16 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,782 वर पोहोचला आहे. आज 2097 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1166 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 128 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना बँक, मेटल आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक तो दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. तर एफएमसीजी, ऑटो आणि फार्मा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. BSE मिडकॅपमध्ये 0.8 टक्क्यांची तर स्मॉलकॅपमध्येही 1.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

शुक्रवारी शेअर बाजारात Hindalco Industries, SBI, JSW Steel, NTPC आणि ICICI Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  Gainers included Tata Motors, Sun Pharma, M&M, ITC आणि HUL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Tata Motors- 8.60 टक्के
  • Sun Pharma- 3.82 टक्के
  • M&M- 2.80 टक्के
  • HUL- 2.59 टक्के
  • ITC- 2.25 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले 

  • Hindalco- 4.40 टक्के
  • JSW Steel- 3.90 टक्के
  • SBI- 3.89 टक्के
  • NTPC- 2.96 टक्के
  • ICICI Bank- 2.65 टक्के 

आज शेअर बाजाराची सुरुवात झाली त्यावेळी सेन्सेक्स 635.43 अंकांनी वधारला होता. तो 53,565.74 वर ओपन झाला. तर बाजार सुरु झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांच्या आत निफ्टीने 16,000 चा आकडा गाठला. निफ्टी 194.30 अंकांनी वधारत 16002 वर पोहोचला होता.