Share Market : शेअर बाजारातील सलग तीन सत्रांच्या तेजीनंतर आज त्याला काहीसा लगाम बसल्याचं स्पष्ट झालं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 116 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 38 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.20 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,567 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.22 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,460 वर पोहोचला आहे. 

आज बाजार बंद होताना FMCG आणि रिअॅलिटी सेक्टरमध्ये चांगली तेजी दिसून आली. त्याचवेळी फार्मा, आयटी आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं. मिडकॅप आणि स्मॉलकॅपचीही ग्रीनमध्ये नोंद झाली. 

रशिया-युक्रेन युद्धाचे सावट आता शेअर बाजारावरुन दूर झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आली. आशियाई शेअर बाजारात किंचित घसरण दिसून आली. शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये 95 अंकांनी वधारत 58779 अंकावर तर, निफ्टी 20 अंकांनी वधारत 17519 अंकावर सुरू झाला होता. पण बाजार बंद होताना त्यामध्ये काही प्रमाणात घसरण झाल्याचं दिसून आलं.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • JSW Steel- 2.10 टक्के
  • Britannia- 1.84 टक्के
  • M&M- 1.66 टक्के
  • HUL- 1.62 टक्के
  • TATA Cons. Prod- 1.51 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Hindalco- 5.05 टक्के
  • Divis Labs- 3.01 टक्के
  • Wipro- 1.48 टक्के
  • Reliance- 1.43 टक्के
  • Dr Reddys Labs- 1.35 टक्के

महत्त्वाच्या बातम्या: