मुंबई : शेअर बाजारात आज किरकोळ बदल झाल्याचं दिसून आलं. आज सेन्सेक्स 33 अंकानी वाढला तर निफ्टीमध्ये 6 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 0.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 55,702 अंकांवर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.04 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,671 वर पोहोचला आहे. निफ्टी बँकमध्ये 101 अंकांची घसरण झाली असून तो 35,163 अंकांवर पोहोचला आहे. 

शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर बाजारामध्ये 600 अंकांची उसळण झाली होती. त्यानंतर मात्र शेअर बाजार पुन्हा खाली आला. आज 1491 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1771 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 116 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना उर्जा, कॅपिटल गूड्स आणि आयटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली. तर फार्मा आणि एफएमजीसी सेक्टरच्या शेअर्समध्ये 0.5 ते 1.5 टक्क्यांची विक्री झाल्याचं दिसून आलं आहे.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही काहीशी घसरण झाली आहे. 

गुरूवारी शेअर बाजारात IndusInd Bank, Tata Consumer Products, Britannia Industries, UltraTech Cement आणि Nestle India या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये  घसरण झाली असून  Tech Mahindra, Hero MotoCorp, Infosys, HCL Technology आणि Wipro या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

दरम्यान, अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हनं देखील व्याजदरात वाढ केली आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकी फेडनं आक्रमक पावलं उचलली आहेत. फेडकडून अपेक्षेप्रमाणे अर्ध्या टक्क्यांनी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. याबाबत फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी घोषणा केली आहे. अमेरिकेत मार्चमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर 2 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचे आव्हान अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेसमोर आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Tech Mahindra- 4.17 टक्के
  • Hero Motocorp- 3.82 टक्के
  • Infosys- 3.23 टक्के
  • HCL Tech- 2.59 टक्के
  • Wipro- 1.91 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • IndusInd Bank- 4.24 टक्के
  • TATA Cons. Prod- 3.35 टक्के
  • Britannia- 3.20 टक्के
  • Sun Pharma- 2.68 टक्के
  • Nestle- 2.55 टक्के

महत्त्वाच्या बातम्या: