मुंबई: दिवसभराच्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार काहीसा सावरल्याचं चित्र आहे. आज बाजार बंद होताना सेन्सेक्स (Sensex) 85.91 अंकांनी वधारला तर निफ्टीही (Nifty) 35.60 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 0.15 टक्क्यांची वाढ होऊन तो 55,550.30 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.21 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,630.50 वर पोहोचला आहे. 

आज 2004 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1257 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 112 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये 2 टक्के तर मेटल, ऑईल अॅन्ड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांची घट झाली आहे. BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही वाढ झाली आहे. 

शुक्रवारी शेअर बाजारात Cipla, BPCL, Sun Pharma, JSW Steel आणि IOC या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून  Nestle India, Maruti Suzuki, Tata Consumer Products, Hindalco Industries आणि NTPC या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Cipla- 5.76
  • Sun Pharma- 3.73
  • BPCL- 3.72
  • JSW Steel- 2.92
  • IOC - 2.27
  • TATA Cons. Prod

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Nestle- 1.82 टक्के
  • Maruti Suzuki-1.51 टक्के
  • TATA Cons. Prod- 1.07 टक्के
  • Hindalco- 0.79 टक्के
  • NTPC- 0.75 टक्के

सुरुवातीला घसरला, नंतर सावरलाशेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये आज 245 अंकांची घसरण दिसून आली. शेअर बाजार 55,218  अंकांवर सुरू झाला. तर निफ्टीमध्ये 66.10 अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टीतही काही प्रमाणात घसरण दिसून आली.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha