मुंबई: काल झालेल्या घसरणीनंतर आजही शेअर बाजारात काहीशी अस्थिरता दिसून आली. अमेरिकेमध्ये महागाईने गेल्या 40 वर्षातील उच्चांकी स्तर गाठला असून त्याचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं आहे. आजही शेअर बाजारात काही प्रमाणात अस्थिरता असल्याचं दिसून आलं. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 153 अंकानी घसरला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 42 अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.29 टक्क्यांची घसरण झाली आणि तो 52,693 वर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.27 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,732 वर स्थिरावला. 


आज शेअर बाजार बंद होताना 1506 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1730 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 132 कंपन्यांच्या शेअ


रिलायन्स, बजाज ऑटो आणि ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याने बाजारात पडझड झाली. तसेच ऑइल इंडिया, एचपीसीएलसारख्या कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भावही 122 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. 


आज शेअर बाजार बंद होताना Bajaj Auto, IndusInd Bank, Hindalco Industries, ONGC आणि Tech Mahindra या कंपन्यांच्या निफ्टी निर्देशांकामध्ये घसरण झाली तर NTPC, M&M, Bharti Airtel, Apollo Hospitals आणि Divis Labs या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. 


ऑटो, मेटल, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे तर कॅपिटल गुड्स, उर्जा आणि रिअॅलिटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये काहीशी वाढ झाली आहे. 


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली


  • NTPC- 1.68 टक्के

  • Bharti Airtel- 1.60 टक्के

  • M&M- 1.49 टक्के

  • Apollo Hospital- 1.49 टक्के

  • Divis Labs- 1.48 टक्के


 

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली


  • Bajaj Auto- 5.14 टक्के

  • IndusInd Bank- 2.46 टक्के

  • ONGC- 2.26 टक्के

  • Hindalco- 2.22 टक्के

  • Tech Mahindra- 2.07 टक्के