मुंबई :  भारतीय शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव दिसल्याने निर्देशांकात घसरण दिसून आली. बँकिंग, आयटी सेक्टर आणि मिड कॅप स्टॉक्समध्ये नफावसुली दिसून आल्याने बाजारात घसरण झाली. आज दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 78 अंकांनी घसरून 65,945 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 9.85 अंकांच्या घसरणीसह 19,664.70 अंकांवर बंद झाला. बाजारात घसरण झाली असली तरी गुंतवणूकदारांचा फायदा झाला. 

आज दिवसभरातील व्यवहारात एफएमसीजी सेक्टरमधील शेअर्समध्ये मोठी तेजी समभागांमध्ये सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे. त्याशिवाय, ऑटो, मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, बँकिंग, आयटी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, फार्मा, मीडिया आणि खाजगी बँका आणि ग्राहकोपयोगी वस्तूंशी निगडीत स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली आहे. मिड-कॅप इंडेक्समध्येही घसरण झाली आहे. तर स्मॉल-कॅप शेअर्समध्ये ही मोठी तेजी दिसून आली. 

सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 15 कंपन्यांपैकी 15 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 27 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. 

नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.45 टक्क्यांची वाढ झाली. टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हरच्या (HUL) शेअर दरात चांगली वाढ झाली. 

टेक महिंद्राचे शेअर्स दर 1.30 टक्क्यांनी घसरले. याशिवाय इन्फोसिस, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये 0.83 ते 0.95 टक्क्यांची घसरण दिसून आली.

इंडेक्‍स किती अंकांवर स्थिरावला दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 65,945.47 66,078.26 65,865.63 -0.12%
BSE SmallCap 37,248.90 37,341.88 37,125.16 0.40%
India VIX 11.19 11.29 9.25 2.61%
NIFTY Midcap 100 40,338.85 40,546.60 40,312.85 -0.17%
NIFTY Smallcap 100 12,552.15 12,596.50 12,503.40 0.57%
NIfty smallcap 50 5,799.35 5,806.90 5,758.75 0.72%
Nifty 100 19,606.05 19,640.95 19,579.65 0.04%
Nifty 200 10,515.65 10,537.95 10,502.95 -0.03%
Nifty 50 19,664.70 19,699.35 19,637.45 -0.05%


गुंतवणूकदारांना फायदा

मुंबई शेअर बाजारावर लिस्टेड असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 22 सप्टेंबर रोजी 318.30 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. त्याआधीच्या दिवशी सोमवारी 25 सप्टेंबर रोजी 317.98 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे आज दिवसभरातील व्यवहारात बाजार भांडवलात 32 हजार कोटींची वाढ झाली आहे. 

डिमॅट अकाउंट होल्डर्सना SEBI कडून रिमाईंडर

बाजार नियामक सेबीनं (SEBI) वैयक्तिक डिमॅट अकाउंट होल्डर्सना (Demat Account Holder) आणि म्युच्युअल फंड (Mutual Fund) गुंतवणूकदारांसाठी नॉमिनी नोंदणी करण्याची, तसेच ही प्रोसेस पूर्ण करण्याची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. SEBI नं म्हटलं आहे की, जर दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर अकाउंट फ्रीज केलं जाईल. बाजार नियामक सेबीनं डिमॅट अकाउंट होल्डर्सना सप्टेंबरच्या अखेरीस नॉमिनी निवडण्याचा किंवा या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय दिला होता. दरम्यान, यापूर्वी सेबीनं 31 मार्च 2023 पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली.