नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या दिवशी शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडको महामंडळातर्फे 21399 घरांची सोडत काढली जाणार आहे.  महाराष्ट्रातील आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी, 21,399 घरांची "माझे पसंतीचे सिडकोचे घर" या गृहनिर्माण योजनेची संगणकीय महासोडत पार पडेल.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही महासोडत पार पडणार आहे. आज (19 फेब्रुवारी) दुपारी 01.00 वाजता संगणकीय सोडत  पार पडेल. ही संगणकीय महासोडत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात.

या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, खारघर पूर्व (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता सदनिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. या योजनेद्वारे 21,399 कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.

सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात.

याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र. 14, सेक्टर-37, तळोजा पंचानंद, पनवेल, खांदेश्वरः भूखंड क्र. 1, सेक्टर-28, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, खारघरः भूखंड क्र. 63 अ. सेक्टर-15, खारघर, पनवेल येथील अनुभव केंद्रांवर देखील करण्यात येणार आहे. यामुळे 21,399 कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी नागरिकांना सुलभरीत्या उपलब्ध होणार आहे.

सिडकोच्या घरांच्या किमती:

गट EWS ( आर्थिक दुर्बल घटक )

तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख खारघर बस डेपो - 48. 3 लाख बामणडोंगरी -31. 9 लाख खारकोपर  2A, 2B -38.6 लाख कळंबोली बस डेपो  - 41.9 लाख 

अल्प उत्पन्न गट एलआयजी -

 पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख  तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख 46.4 लाख मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख खारकोपर ईस्ट - 40.3 लाख वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख

इतर बातम्या :

Cidco My Homes Lottery : सिडकोच्या 26000 घरांची सोडत काही तासांवर, संगणकीय लॉटरी ड्रॉ कुठं पाहणार? सर्व माहिती एका क्लिकवर 

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी बुकिंग शुल्क भरलेल्या प्रत्येकाला घर मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज, आकडेवारी समोर