Trump Tariff on China: चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पयांनी चीनवर 125 टक्के टॅरिफ लादलं आहे. तर, चीननं अमेरिकेवर 84 टक्के टॅरिफ लादलं आहे. अमेरिका आणि चीनमधील वाढणारा वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सोशल मीडियावर कोरिया विरुद्धच्या युद्धावेळी चीन कम्युनिस्ट पार्टीचे तत्कालीन नेते माओ त्से तुंग यांचा एख व्हिडिओ शेअर करत भूमिका मांडली आहे.
अमेरिकेनं चीनवर 104 टक्के टॅरिफ लादल्यानंतर चीननं देखील पलटवार केला आहे. चीननं अमेरिकेवर 84 टक्के टॅरिफ लादले आहेत. चीनच्या या भूमिकेनं संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 125 टक्के टॅरिफ लादल्याची घोषणा केली. टॅरिफच्या मुद्यावरुन दोन्ही देश एकमेकांसमोर आले आहेत. या दरम्यान चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सोशल मीडियावर जुना व्हिडिओ पोस्ट करत मागं हटणार नसल्याचं म्हटलं आहे. हा है कि हम पीछे नहीं हटेंगे.
चीनच्या माओ निंग काय म्हणाल्या?
चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत माओ त्से तुंग यांचा एक संवाद पाहायला मिळतो. युद्ध कितीही लांबलं तरी आम्ही झुकणार नाही. आम्ही विजय मिळवेपर्यंत लढत राहू असं माओ त्से तुंग त्या व्हिडिओत म्हणत आहे. हा व्हिडिओ कोरिया विरुद्धच्या युद्धावेळचा आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये माओ निंग यांनी म्हटलं की आम्ही चिनी आहोत, कुणी उचकवलं तरी आम्ही घाबरत नाही, आम्ही मागं हटणार नाही.
चीनच्या विदेश मंत्रालयाकडून हे सांगण्यात आलं की आम्हाला अमेरिकेशी लढण्यात भीती वाटत नाही. मात्र, चीनला अमेरिकेसोबत लढायचं नाही. जर ट्रम्प यांच्या धमक्या सुरु राहणार असतील तर काही भीती नाही. अमेरिका जे करतेय त्याला लोकांचा पाठिंबा नाही, त्यामुळं लवकरच ते अयशस्वी होतील, असं लिन जियान म्हणाले .
व्हाइट हाऊसमधील नास्कर इव्हेंटमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की ते शी जिनपिंग यांच्यसोबत चर्चेसाठी तयार आहेत. दोन्ही देशांमधील तणाव वाढल्याची स्थिती असताना ट्रम्प यांचं हे वक्तव्य आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं कौतुक देखील केलं. ते म्हणाले की जिनपिंग यांना माहिती आहे की त्यांना काय करायचं आहे. जिनिंग यांना त्यांच्या देशाबद्दल प्रेम आहे, असं ट्रम्प म्हणाले.