Cheap Flight Ticket Offer by this Airlines: कोरोना महासाथ सुरू झाल्यानंतर जगभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही झाला असून अनेक उद्योग, व्यवसायांचे मोठे नुकसान झाले. अनेक देशांनी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे विमान कंपन्यांना मोठा फटका बसला. प्रवाशांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी विमान कंपन्यांनी लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी खास ऑफर लाँच केली आहे.
आता अनेकांचे लसीकरण झाले असून कोरोना निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आली आहे. त्यानंतर आता अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे ओढण्यासाठी विमान कंपन्यांची चढाओढ सुरू झाली आहे. लसीकरण झालेल्या प्रवाशांना ऑफर देण्यात येत असून येत्या काही दिवसात तिकिट बुक केल्यास फायदा होऊ शकतो.
अशी आहे ऑफर
कोरोना लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी इंडिगो विमान कंपनी तिकिट दरात सवलत देणार आहे. इंडिगोमधून 15 दिवसांनी प्रवास करू इच्छिणाऱ्या आणि लसीकरण झालेल्या प्रवाशांना या ऑफरचा फायदा होऊ शकतो. लसीकरण झालेल्या प्रवाशांना किमान 10 टक्के सवलत मिळू शकते. यासाठी VAX FARE हा पर्याय निवडावा लागणार आहे.
कोरोनामुळे विमान कंपन्यांना मोठा फटका बसला होता. अनेक महिने प्रवासी विमान सेवा ठप्प होती. त्यामुळे विमान कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- LPG Cylinder : चांगली बातमी! 'या' महिन्यात गॅस सिलिंडर बुक करा, पुढील महिन्यात पैसे द्या
- PSU Privatization : येत्या आर्थिक वर्षात तीन सरकारी कंपन्यांचे खासगीकरण; तीन आयपीओही येणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha