New Rules : आजपासून नवीन मे (May) महिन्याला सुरुवात झाली आहे. आजचा दिवस अनेकांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. कारण आजपासून काही महत्वांच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होणार आहे. या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. या महिन्यापासून नेमके कोणते बदल होणार आहेत, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.  


आजपासून पैशाशी संदर्भातील नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत (LPG cylinder Price) घसरण झाली आहे. तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यावरील शुल्कामध्ये अनेक बदल झाले आहेत. 


येस बँकसंदर्भात महत्वाचा बदल


मिळालेल्या माहितीनुसार, येस बँकेच्या प्रो मॅक्स बचत खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लक 50,000 रुपये करण्यात आली आहे. तर कमाल शुल्क 1000 रुपये करण्यात आले आहे. तर दुसरीकडे Pro Plus, Yes Respect SA आणि Yes Essence SA खात्यांसाठी, किमान सरासरी शिल्लक मर्यादा रुपये 25,000 आणि कमाल शुल्क रुपये 750 करण्यात आले आहे. तर Pro खात्यात किमान शिल्लक 10000 तर कमाल 750 असणं गरजेचं आहे.


आयसीआयसीआय बँक सेव्हिंग कार्डमध्ये होणार बदल


आयसीआयसीआय बँक सेव्हिंग कार्डमध्ये आजपासून महत्वाचे बदल होणार आहेत. नवीन नियमानुसार ग्रामीण भागातील ग्राहकांना डेबिट कार्डसाठी 99 रुपये आणि शहरी भागातील ग्राहकांसाठी  200 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागेल. तर दुसरीकडे बँकेने 25 पानांच्या चेकबुकसाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, 25 पानांच्या नंतर प्रत्येक पानासाठी 4 रुपयांचे शुल्क आकारावे लागणार आहे. 


विशेष FD योजनेसंदर्भात महत्वाचे बदल


विशेष FD योजनेसंदर्भात महत्वाचा बदल झाला आहे. HDFC बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष FD योजना सुरु केलीय. या योजनेत सामील होण्यासाठी अंतिम मुदत ही 10 मे करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्यांना 0.75 टक्के अतिरिक्त व्याजदर भरावा लागणार आहे. यामध्ये पाच ते दहा वर्षाच्या FD योजनेवर 7.75 टक्के व्याजदराचा लाभ मिळू शकतो. 


दरम्यान, प्रत्येक पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या दरातही बदल होतात. त्यामुळं आजपासून म्हणजे एक मे पासून एलपीजी सिलिंडरच्या दरात घसरण झाल्याची माहिती मिळत आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. कारण सध्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अशातच एलपीजी सिलिंडरच्या दरात घसरण झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


1 मे पासून ICICI बँकेचे नियम बदणार, 'या' सेवांसाठी द्यावे लागणार पैसे