नागपूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  27 डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ करणार असल्याची माहिती दिली. देशातील सर्व जिल्ह्यात डिजीटल पद्धतीनं जिल्हाधिकारी ठरवतील त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीनं हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्राचे सर्व मंत्री, देशातील सर्व मंत्री त्या त्या जिल्ह्यात स्वामित्व योजनेची सुरुवात करणार आहेत. नरेंद्र मोदी 12.30 वाजता स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 


महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात योजना सुरु होणार


स्वामित्व योजना म्हणजे खरंतर आपण बघितलं की ग्रामीण महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत. जमिनीवरुन वाद विवाद, मालकी हक्कावरुन वादविवाद, नागरिकांना त्यांच्या मालकीच्या घराचे पट्टे नसल्यानं, प्रॉपर्टी कार्ड नसल्यानं कळत नकळत कुणीही कब्जा करतं. वडिलोपार्जित शेकडो वर्षाची घरं, जमिनी त्याचं कार्ड प्रत्येक शेतकऱ्याकडे असलं पाहिजे यासाठी नरेंद्र मोदी यांनी विचार केला. आधुनिक युगात, आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे, यासाठी नरेंद्र मोदी यांनी ड्रोनच्या माध्यमातून महाराष्ट्राचं, देशाचं सर्वेक्षण करण्यात आलं. महराष्ट्राच्या जवळपास 30 जिल्ह्यात या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे.30515 गावं डिजीटलाईज होणार आहे. त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे, असं चंद्रशखेर बावनकुळे म्हणाले. 


गावपातळीवर नकाशे उपलब्ध करणे, गावठाणातील घराबद्दल स्पष्टता येणे, बांधकाम परवानगी देण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड असल्यानं दुसऱ्या कागदपत्राची गरज नसणे. मालमत्ता कर लावण्यापासून, पुढच्या पिढीला डॉक्युमेंटेशन साठी फायदा होणार आहे. यात चार पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गावकऱ्यांची आर्थिक पत वाढणार आहे. आज ज्या पद्धतीनं डिजीटल कार्ड मिळणार आहे,त्यामाध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक पत उंचावणार आहे. गृहकर्ज घेण्यासाठी डॉक्युमेंट मिळेल. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना घेण्यासाठी डॉक्युमेंट मिळेल. एखादी योजना आली तर शेतीच पैसे, पीक नुकसान भरपाई असेल तर आधार सीडिंग करतो. व्यवसाय करण्यासाठी प्रॉपर्टी कार्डचा फायदा होणार आहे. स्वंयपूर्ण रोजगार, स्वंयपूर्ण गावठाण निर्माण होणार आहे,असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.  आदिवासी भागात देखील स्वामित्व योजनेद्वारे दिलं जाणारं प्रॉपर्टी कार्ड महत्त्वाचं ठरणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. 


स्वामित्व योजनेतून ग्रामीण महाराष्ट्राला मजबुती देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीनं आभार मानतो. जनतेला जनतेचे हक्क मिळवून देण्याचा उपक्रम नरेंद्र मोदी यांनी हाती घेतल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 


इतर बातम्या :