Union Budget 2022 : सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. पेगासस हेरगिरी प्रकरण, पूर्व लडाखमधील चिनची घुसखोरी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारी यासह अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. 


संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत असून त्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. त्याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामण 2021-22 साठी आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. अर्थमंत्री 1 फेब्रुवारी रोजी 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.


संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले, "सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये विरोधी पक्षाने जे काही मुद्दे उपस्थित केले आहेत त्यावर विचार केला जाईल."


'या' मुद्द्यांवरून गदारोळ होऊ शकतो


अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोनाबाधित कुटुंबांना मदत पॅकेज, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, सीमेवर चीनसोबतची अडवणूक आणि अन्य काही मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा निर्णय प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने घेतला आहे. "सीमेवर चीनची वाढती आक्रमकता आणि त्यामुळे सुरू असलेली अडवणूक, महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची स्थिती, एअर इंडियाचे खासगीकरण आणि इतर सरकारी कंपन्यांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला जाब विचारला जाईल.


राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी संसदेचे अधिवेशन सुरळीत चालावे यासाठी सोमवारी सभागृहातील राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. लोकसभा सचिवालयाच्या बुलेटिननुसार, 31 जानेवारी रोजी व्यवसाय सल्लागार समितीची बैठक होणार आहे.


महत्वाच्या बातम्या