Railway Budget For Mumbai :  नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2023) रेल्वेच्या बजेटमध्ये वाढ करण्यात आली. मुंबईकर प्रवाशांसाठी (Mumbai Local Train Commuter) केंद्र सरकारने भरघोस तरतूद केली आहे. त्यामुळे मुंबई लोकल प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक प्रकल्पांना वेग येणार आहे. येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन मुंबई रेल विकास प्राधिकरण (Mumbai Railway Vikas Corporation) करत असलेल्या सर्वच प्रकल्पांना प्रचंड निधी मिळाल्याने सर्वच प्रकल्प अधिक वेगाने होण्यास होणार मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे.  यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी केली. वर्ष 2013 च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात 9 पटीने वाढ करण्यात आली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात राज्यासाठी 13 हजार 539 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मराठवाड्यासाठी रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भुसावळ विभागासाठी 1470.94 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 


मुंबई लोकल प्रवाशांसाठी मुंबई रेल विकास प्राधिकरणाच्या (MRVC) माध्यमातून प्रकल्प राबवण्यात येत आहेत. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा निधी असतो. नुकत्याच जाहीर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात यावर्षी 'एमयूटीपी' साठी 1101 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेला (Central Railway) यावर्षी 10 हजार 600 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा निधी गेल्यावर्षीपेक्षा 46 टक्के अधिक आहे. गेल्यावर्षी 7 हजार 251 कोटी रुपये निधी देण्यात आला होता. बेलापूर-सीवूड-उरण लाईनसाठी  20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक 10, 11, 12, 13 हे  24 डब्यांसाठीचा विस्तार करण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


एमयूटीपी प्रकल्पांना किती निधी?


एमयूटीपी 2 मधील प्रकल्पांसाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  एमयूटीपी 3 मधील प्रकल्पांना 650 कोटी आणि एमयूटीपी 3A मधील प्रकल्पांसाठी 300 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात 575 कोटी देण्यात आले होते. यंदाच्या वर्षात 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 


> एमयूटीपी 2 मधील प्रमुख प्रकल्प 


- परेल कुर्ला दरम्यान 5 वी 6 वी मार्गिका, 
- मुंबई सेंट्रल बोरिवली दरम्यान 6 वी मार्गिका 


> एमयूटीपी 3 मधील प्रकल्प 


- पनवेल कर्जत दरम्यान नवीन उपनगरीय कॉरिडॉर 
- ऐरोली कळवा लिंक 
- विरार ते डहाणू दरम्यान चौपदरीकरण
- रुळ ओलांडू नये यासाठीच्या उपयोजना 


> एमयूटीपी 3 A मधील प्रकल्प 


- बोरिवली विरार 5 वी 6 वी मार्गिका 
- कल्याण बदलापूर 3 री 4 थी मार्गिका 
- हार्बर लाईन सिग्नल अपग्रेड
- गोरेगाव ते बोरिवली हार्बर लाईन विस्तार 
- कल्याण यार्ड रीमोडेलिंग 
- कल्याण ते आसनगाव 4 थी मार्गिका 
- 97 नवीन स्टाबलिंग लाइन्स


इतर महत्त्वाची बातमी :