Railway Budget 2023 Maharashtra : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेसाठी मोठी तरतूद केली. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी केली. वर्ष 2013 च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात 9 पटीने वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे अर्थसंकल्पात राज्यासाठी 13 हजार 539 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मराठवाड्यासाठी रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भुसावळ विभागासाठी 1470.94 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पानंतर रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेला किती रक्कम, प्रकल्प आले याची अनेकांना उत्सुकता लागली होती. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प आणि इतर कामांसाठी 13 हजार 539 कोटींचा निधी दिला आहे. आतापर्यंतहा महाराष्ट्रासाठी सर्वाधिक निधी असल्याचा दावा रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी केला. आज, दिल्लीतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले की, यंदाच्या अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटीचा निधी महाराष्ट्राला दिला आहे. वर्ष 2009 ते 2014 या दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्रासाठी 1170 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्या तुलनेत महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी यंदा मोठी तरतूद आहे.
रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटले की, वंदे मेट्रो या वर्षी डिझाइन केली जाणार आहे. दोन शहरांना जोडण्याचं काम ही ट्रेन करणार आहे. त्याशिवाय, याच वर्षात हायड्रोजन ट्रेन तयार केली जाणार आहे. सध्या त्याच्यावर काम सुरू आहे. डिसेंबर 2023 पर्यंत हायड्रोजन ट्रेन तयार होणार आहे.
महाराष्ट्रासाठी प्रमुख प्रकल्प
> नांदेड-देगलूर-बिदर नवीन रेल्वेमार्गसाठी 100 कोटी रुपये तरतूद
> अंकाई-संभाजीनगर दुहेरीकरण मंजुरी नाहीच
> नांदेड - यवतमाळ -वर्धा नवीन रेल्वेमार्ग 850 कोटी रुपये
> परळी वैजनाथ - बीड-नगर नवीन रेल्वेमार्ग 400 कोटी 95लाख रुपये
> दौंड - मनमाड दुहेरीकरण 430 कोटी रुपये
> लोंढा-मीरज-पुणे दुहेरीकरण 900 कोटी रुपये
> कल्याण - कसारा तिसरी लाईन 90 कोटी रुपये
> मनमाड-जळगाव तिसरी लाईन 350 कोटी रुपये
> वर्धा-नागपूर तिसरी लाईन 150 कोटी रुपये
> वर्धा - बल्हारशहा तिसरी लाईन 300 कोटी रुपये
> नागपूर-इटारसी तिसरी लाईन 310 कोटी रुपये
> वर्धा -नागपूर चौथी लाईन 150 कोटी रुपये
> अकोला-खंडवा-महू गेज कनव्हर्जन साठी 700 कोटी रुपये
> सोलापूर -तुळजापूर-धाराशिव 110 कोटी तरतूद
> धुळे -नरडाणा 100 कोटी रुपयांची तरतूद
इतर महत्त्वाच्या बातम्या: