Budget 2022 : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनाचे संकट काहीसे निवळल्याने अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने शेतकऱ्यांसाठी आणि करदात्यांसाठी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 


यंदाच्या अर्थसंकल्पात या महत्त्वाच्या 15 गोष्टींवर सगळ्यांचे लक्ष असणार आहे. 


1. अर्थसंकल्पात शेतकरी, कृषीसंबंधित क्षेत्र आणि एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर असण्याची शक्यता आहे
2. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ होऊ शकते
3. शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) अधिक मजबूत करण्याची घोषणा होऊ शकते.
4. किसान पेन्शन योजनेच्या तरतुदींमध्ये वाढ आणि विस्तार होऊ शकतो.
5.अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी काही सवलती जाहीर केल्या जाऊ शकतात, गेल्या एका वर्षात अन्न प्रक्रिया निर्यातीत सुमारे 40 टक्क्यांनी वाढली आहे.
6. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ होण्याची शक्यता
7. मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न असणार आहे. आयकर मर्यादेच्या सवलतींकडे लक्ष
8. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयात शुल्कात कपात होण्याची शक्यता आहे.
9. भांडवली खर्च (Capital Expenditure)वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. जेणेकरून पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अधिक खर्च करता येईल.
10.FICCI आणि इतर उद्योग संघटनांनी सरकारला महसुली तुटीवर कमी आणि गुंतवणुकीवर अधिक भर द्यावा असे आवाहन केले आहे. 
11. . वाहने आणि इतर वस्तूंमध्ये वापरल्या जाणार्‍या सेमीकंडक्टर चिप्सच्या आयात आणि उत्पादनाबाबत काही सवलती जाहीर होण्याची शक्यता आहे. 
12. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही घोषणा होण्याची शक्यता आहे. 
13. लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोरोना महासाथीचा मोठा फटका या क्षेत्राला बसला होता. 
14. सरकारने या उद्योगांसाठी आधीच एक योजना जाहीर केली होती, ज्यामध्ये क्रेडिट हमी योजना सर्वात महत्त्वाची आहे.
15. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड (COVID 19) मुळे उद्भवलेली आव्हाने आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकारणातील गरजा यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न असेल. मात्र अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.