Agriculture Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी आज मोदी सरकारच्या (Modi Govt) दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अर्थसंकल्पात नेमकं कोणत्या घोषणा होणार? या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळणार याकडं शेतकऱ्यांचं लक्ष होतं.  या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राकडेही लक्ष देण्यात आले आहे. कृषी क्षेत्राला या अर्थसंकल्पात नेमकं काय मिळालं यासंदर्भात सविस्तर माहिती पाहुयात. 


दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार


अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात सर्वांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावरही भर देण्यात आला आहे.  दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केला आहे. PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ दिला असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.


शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रणेवर भर


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. तसेच नॅनो युरियाच्या यशानंतर आता नॅनो डीएपीचा प्रयोग करण्यात येणार आहे. दुग्ध उत्पादकांच्या मदतीसाठी योजना आखण्यात येणार आहे. तसेच शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रणेवर भर देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विम्याचा फायदा झाला आहे. तर 80 कोटी लोकांना मोफत धान्यवाटप करण्यात आलं आहे. तर 390 कृषी विद्यापीठं सरकारनं सुरु केली आहेत. तेलबियांमध्ये देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सरकार 5 इंटीग्रेटेड अॅक्वा पार्क्स उघडणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.  तसेच मोहरी आणि भुईमूग लागवडीलाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Union Budget 2024 : एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवलं, दरमहा 300 युनिट वीज मोफत; निर्मला सीतारमण यांच्या बजेटच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे