Bank Closed : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे लोक प्रचारात व्य्त आहे. परवा म्हणजे  7 मे रोजी देशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आत्तापर्यंत मतदानाचे दोन टप्पे झाले आहेत. दरम्यान, या मतदान प्रक्रियमुळं 7 मे रोजी देशातील अनेक ठिकाणी बँकांना (Bank) सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळं ज्यांना बँकेचे व्यवहार करायचे आहेत, त्यांनी यादी तपासूनच बाहेर पडावे, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.  


19 एप्रिलला देशात मतदानाचा पहिला टप्पा पार पडला होता. दुसरा टप्पा 26 एप्रिलला आणि आता तिसरा टप्पा हा 7 मे रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बँकांना सुट्टी देण्यात आलीय. त्यामुळं बँकेसंदर्भात व्यवहार करताना यादी तपासून व्यवहार करा. 


या शहरांमध्ये बँका राहणार बंद


लोकसभा निवडणुकीमुळे आरबीआयने सुट्टीची यादी आधीच जाहीर केली आहे. त्यानुसार तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अहमदाबाद, भोपाळ, पणजी आणि रायपूर या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.


या जागांवर तिसऱ्या टप्प्यात होणार निवडणुका  


कोकराझार, धुबरी, बारपेटा, गुवाहाटी, झांझारपूर, सुपौल, अररिया, मधेपुरा, खगरिया, सुरगुजा, रायगड, जांजगीर-चंपा, कोरबा, बिलासपूर, दुर्ग, रायपूर, उत्तर गोवा, दक्षिण गोवा, कच्छ, बनासकांठा, पाटण, महेसाणा, साबार गांधीनगर, अहमदाबाद पूर्व, अहमदाबाद पश्चिम, सुरेंद्रनगर, राजकोट, पोरबंदर, जामनगर, जुनागढ, अमरेली, भावनगर, आनंद, खेडा, पंचमहाल, दाहोद, वडोदरा, छोटा उदयपूर, भरूच, बारडोली, सुरत, नवसारी, वलसाड, चिक्कोडी, बेळगाव, बागलकोट , विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पल, बेल्लारी, हावेरी, धारवाड, उत्तरा कन्नड, दावणगेरे, शिमोगा, मुरैना, भिंड, ग्वाल्हेर, गुना, सागर, विदिशा, भोपाळ, राजगड, रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, , माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकंगले, संभल, हाथरस, आग्रा, फतेहपूर सिक्री, फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, बदाऊन, आमला, बरेली, मालदा उत्तर, मालदा दक्षिण, जंगीपूर, मुर्शिदाबाद, दादर , दमण आणि दीव, अनंतनाग-राजौरी या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 


याचबरोबर मे महिन्यात बँकांना आणखी काही सुट्टी आहेत. यामध्ये 11 मे रोजी दुसरा शनिवार असल्यानं बँका बंद राहणार आहेत. तर 23 मे रोजी देखील बँकांना सुट्टी देण्यात आलीय.  कारण गुरुवारी बुद्ध पौर्णिमा आहे. तर 25 मे रोज चौथा शनिवार आहे. त्यामुळं बँकांना सुट्टी आहे. 


महत्वाच्या बातम्या:


2 हजारांच्या नोटेबाबत RBI ची मोठी अपडेट; परत आल्या 97.76 % नोटा, चलनात केवळ 2.24 टक्केच