Bank Holidays in October 2022 : ऑक्टोबर (October) महिना सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. ऑक्टोबर महिना म्हटला की नवरात्र, दसरा आणि दिवाळी असा सणांनी भरलेला हा महिना आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्यांची यादी देखील भरपूर आहे. त्यामुळे ग्राहकांना जर बॅंकेत काही महत्वाची कामं असतील तर आताच उरकून घ्या. कारण ऑक्टोबर महिन्यात 10 दिवस बॅंका बंद (October Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार ऑक्टोबर महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद (October Bank Holidays) असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.  


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार ऑक्टोबरमध्ये एकूण 10 दिवस बँक सुट्टी (October Bank Holidays) असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.


सुट्ट्यांची संपूर्ण यादी  (Bank Holidays List in October 2022) :


2 ऑक्टोबर : गांधी जयंती - सुट्टी (रविवार)  


5 ऑक्टोबर दसरा : सुट्टी (बुधवार)


8 ऑक्टोबर : बँक सुट्टी (दुसरा शनिवार)


9 ऑक्टोबर : बँक हॉलिडे (ईद-ए-मिलाद) रविवार सुट्टी


16 ऑक्टोबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


22 ऑक्टोबर : बँक सुट्टी (चौथा शनिवार सुट्टी)


23 ऑक्टोबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


24 ऑक्टोबर : दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी, लक्ष्मीपूजन (दिवस सोमवार)


25 ऑक्टोबर : दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी


30 ऑक्टोबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करू शकाल. लाँग वीकेंडसाठी, तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करू शकता.


महत्वाच्या बातम्या :