Bank FD News : बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाच्या आधी एक भेट दिली आहे. आता ग्राहक वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर जास्त व्याज घेऊ शकतात. बँकेने मुदत ठेवींचे व्याजदर 10 बेस पॉईंट्सने वाढवले आहेत. विविध मुदतपूर्ती कालावधीसाठी 125 bps केले आहेत. हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी लागू आहेत. हे व्याजदर आजपासून म्हणजे 29 डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत.


बँक ऑफ बडोदा नवीन एफडीवरीव व्याजदर किती?


बँकेने 7 दिवस ते 14 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वसामान्य रहिवाशांसाठी FD व्याजदर 3 टक्क्यांवरुन 4.25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.


बँकेने 15 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी 100 आधार अंकांनी 3.50 टक्क्यांवरून 4.50 टक्क्यांपर्यंत दर वाढवला आहे.


बँकेने 46 दिवसांपासून ते 90 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदर 5 टक्क्यांवरुन 5.50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.


बँकेने 91 दिवसांपासून ते 180 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदर 5 टक्क्यांवरुन 5.60 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.


बँकेने 181 दिवसांपासून ते 210 दिवसांच्या कालावधीसाठी दरात 25 आधार अंकांची वाढ केली आहे.


या बँकांनी केली FD च्या दरात वाढ


बँक ऑफ बडोदा व्यतिरिक्त अनेक बँकांनी या महिन्यात एफडीचे दर वाढवले ​​आहेत. यामध्ये SBI, HDFC बँक, ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक इत्यादींचा समावेश आहे. बँक ऑफ इंडियाने 1 डिसेंबर 2023 पासून आपल्या ग्राहकांसाठी आणि सामान्य लोकांसाठी मुदत ठेवींच्या दरात (रु. 2 कोटी आणि वरील आणि 10 कोटी रुपयांपेक्षा कमी) वाढ केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी व्याजदर वाढवले ​​आहेत. नुकत्याच झालेल्या सुधारणांनंतर, कोटक बँक सात दिवस ते दहा वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर सामान्य ग्राहकांसाठी 2.75 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. 


Fd म्हणजे काय?


अनेकांना प्रश्न पडतो तो म्हणजे Fd म्हणजे काय? Fd म्हणजे Fix Deposit. फिक्स म्हणजे निश्चित आणि डिपाँझिट म्हणजे जमा म्हणजेच एक अशी रक्कम जी एका निश्चित कालावधीसाठी ठाराविक आणि निश्चित व्याजदरावर आपण बँकेत जमा करत असतो. एफ डी मध्ये आपण एका निश्चित कालावधीसाठी बँकेत पैसे जमा करत असतो.


महत्त्वाच्या बातम्या: