मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशांत बहुतांश राज्यांत लॉकडाऊनची लावण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात सर्वाधिक व्यवहार घरात बसून ऑनलाईन ट्रान्झॅक्शनने होत आहेत. व्यावसायिक, बँक आणि असे ग्राहक जे घरबसल्या एनईएफटीचा (NEFT) वापर करत आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच NEFT सेवा आज 23 मे रोजी 14 तासांसाठी बंद राहणार आहे. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ट्विट याबाबत माहिती दिली.






रिझर्व्ह बँकेनं एक पत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली. त्याचसोबत यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे. RBI ने म्हटलं की, एनईएफटी सर्व्हिसची सेवेची कार्यक्षमता आणि नियमन सुधारण्यासाठी टेक्निकल अपग्रेड केलं जात आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी रात्री 00.01 मिनिटांपासून दुपारी 14.00 वाजेपर्यंत म्हणजेच दुपारी दोन वाजेपर्यंत NEFT सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत आरटीजीएस सेवा मात्र सुरू राहणार आहे.  


नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर सिस्टम ही अशी सुविधा आहे, जी तुम्हाला तुमच्या बँकेच्या मोबाईल अ‌ॅपवर वापरता येते. या सुविधेद्वारे काही मिनिंटांमध्ये पैसे पाठवले जातात. अनेक जण मोठी रक्कम देण्यासाठी NEFT सेवेचा वापर करतात. या माध्यमातून रक्कम पाठवण्यासाठी कोणतीही किमान मर्यादा नाही.


RTGS आणि NEFT साठी आता बँकेची गरज भासणार नाही 


दरम्यान, केंद्रीय बँक आरबीआयने आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या आर्थिक धोरणात (RBI Monetary Policy) हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेद्वारे नॉन-बँक पेमेंट संस्थांसाठी संचालित केंद्रीय भरणा प्रणाली आरटीजीएस आणि एनईएफटी (NEFT) च्या सदस्यत्वासाठी परवानगी दिली आहे. आरबीआयच्या या प्रस्तावामुळे पीपीआय, कार्ड नेटवर्क, वाइड लेव्हल एटीएम ऑपरेटर यांसारख्या नॉन-बँक पेमेंट सिस्टम देखील मध्यवर्ती बँकेद्वारे संचालित आरटीजीएस आणि एनईएफटीचं सदस्यत्व घेऊ शकतील. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :