Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनाचा सोहळा अगदी जवळ आला आहे. उद्या (सोमवार 22 जानेवारी) अयोध्येत राममंदिराचा अभिषेक मोठ्या थाटामाटात होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी अनेक स्तरांतून सुरू असून, उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या वातावरणाचा व्यापारी जगतालाही मोठा फायदा होत आहे. व्यावसायिकांना करोडो रुपयांचा व्यवसाय होत आहे. ट्रेड बॉडी CAT ने दावा केला आहे की राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत देशभरातील व्यापाऱ्यांचा 1 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.


CAT म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स. ही किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना आहे. राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळं देशभरातील व्यापाऱ्यांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला आहे. 


हर शहर अयोध्या-घर घर अयोध्या मोहिम


व्यापारी समुदायाने ‘हर शहर अयोध्या-घर घर अयोध्या’ ही राष्ट्रीय मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत दिल्ली आणि देशातील सर्व राज्यांतील व्यापारी संघटनांनी 22 जानेवारी रोजी आपापल्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. हे सर्व कार्यक्रम बाजारपेठेतच होतील, त्यामुळेच उद्या दिल्लीसह देशातील सर्व बाजारपेठा खुल्या राहतील आणि व्यापारी सर्वसामान्यांसोबत श्री राम मंदिराचा उत्सव साजरा करतील.


देशभरात 30 हजारांहून अधिक कार्यक्रम होणार 


सोमवारी दिल्लीत 2 हजारांहून अधिक छोटे-मोठे कार्यक्रम होणार आहेत. देशभरात 30 हजारांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शतकातील हा सर्वात मोठा दिवस असेल, जेव्हा एकाच दिवशी अनेक कार्यक्रम होतील असे कॅटचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले. घर, बाजार, मंदिरे आणि इतर ठिकाणे सजवण्यासाठी फुलांची मागणी खूप वाढली आहे. मातीचे दिवे विकत घेणारा लोकांचाही ओघ कायम आहे. मिठाईच्या दुकानांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. लोक प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करत आहेत. बाजारात राम झेंडे आणि राम फलकांचा तुटवडा आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Ram Mandir : प्रभू श्रीरामाला 114 कलशांच्या पाण्याने स्नान, रामललाच्या मंडपाची पूजा