Ayodhya Hotels : प्रभू रामाची नगरी अयोध्या (Ayodhya) सध्या चर्चेत आहे. 22 जानेवारीला नव्याने बांधलेल्या राम मंदिराचा उद्घाटन (Ram mandir inauguration) सोहळा होणार आहे. त्याबाबत देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी 22 ते 23 जानेवारीदरम्यान अयोध्येत हॉटेल्स बुकींग सुरु झाली आहे. एका रात्रीचं भाडे एकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीचे हॉटेल्सचे रात्रीचे भाडे 70000 रुपयांपेक्षा जास्त आहे.  तसेच विमान वाहतूक क्षेत्रही अयोध्येवर लक्ष ठेवून आहे. इंडिगो आणि एअर इंडिया सारख्या विमान कंपन्या त्यांची थेट उड्डाणे सुरू करणार आहेत.


तीन ते पाच लाख भाविक येण्याची शक्यता 


अहवालात दिलेल्या माहितीनुसार 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराच्या उद्घाटन दिवशी  देशभरातून सुमारे 3 ते 5 लाख भाविक अयोध्येला पोहोचतील. हा आकडा आणखी जास्त असू शकतो. या कार्यक्रमासाठी अयोध्येतील बहुतांश हॉटेल्स आधीच बुक झाले आहेत. ज्या हॉटेलमध्ये या तारखांना खोल्या उपलब्ध आहेत, त्यांचे भाडे गगनाला भिडले आहे. आगामी काळात अयोध्येत हॉटेल व्यवसायात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन रॅडिसन ब्लू आणि ताज हॉटेल्स या साखळी कंपन्याही तिथे आपली हॉटेल्स बांधण्याचा विचार करत आहेत.


22 जानेवारीला श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा


22 जानेवारीला श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. यादिवशी हॉटेल्सचे एका दिवसाचे भाडे हे 70,000 रुपये आहे. जेव्हा तुम्ही 22 जानेवारीला हॉटेल बुक करण्यासाठी Booking.com आणि MakeMyTrip या ऑनलाइन हॉटेल बुकिंग साइटवर लॉग इन करता तेव्हा अयोध्येजवळ फैजाबादमधील सिग्नेट कलेक्शन हॉटेलमध्ये एका खोलीचे भाडे 70,240 रुपये दाखवले जात आहे. एवढेच नाही तर इतर हॉटेल्सबद्दल बोलायचे झाले तर रामायण हॉटेलमध्ये एक रुम सुमारे 40,000 रुपये प्रतिदिन भाड्याने उपलब्ध आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Uddhav Thackeray : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण असणारच, श्रीराम तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाची 'एबीपी माझा'ला माहिती