महिंद्रा ईकेयूव्ही 100 मध्ये 40 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे जी 54.4 एचपीची पावर आणि 120 एनएम टॉर्क देते. त्यातील बॅटरी लिक्विड कूल्ड आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार पूर्ण चार्ज केल्यानंतर 150 किलोमीटरपर्यंत जाता येईल. शहरांमध्ये बरेच रहदारी असल्याने याची ड्राइव्ह रेंज कमी होईल.
महिंद्राने नवीन eKUV100 मध्ये वेगवान चार्जिंगची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली आहे. ज्याच्या मदतीने ही कार 60 मिनिटांत 80 टक्के चार्जिंग होईल. परंतु स्टँटर्ड चार्जरच्या मदतीने संपूर्ण चार्जिंगसाठी 5.45 तास लागतात.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन eKUV100 चे बुकिंग यावर्षी मार्चपासून सुरू होईल, तर एप्रिलपासून त्याची डिलीव्हरी देण्यात येणार आहे. कंपनीने या कारच्या डिझाईनमध्ये बरेच बदल केले आहेत. हे सध्याच्या KUV100 NXT थोडे वेगळे आहे. त्याच्या पुढ्यात बरेच बदल आहेत. इतकेच नाही तर त्याच्या हेडलाईट आणि टेललाईटमध्येही बदल केले आहेत.
आता हे पाहावे लागेल, की ही कार भारतीय रस्त्यावर कधी धावेल, वेग पकडण्यास किती सक्षम आहे. महिंद्रापूर्वी टाटा मोटर्स, किआ मोटर्स ह्युंदाई मोटर इंडियासारख्या कंपन्यांनीही स्वत: चे मॉडेल्स लॉन्च केले आहेत.