Chief Economic Advisor : देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. अर्थमंत्रालयाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. डिसेंबर 2021 मध्ये के. व्ही. सुब्रमण्यम यांचा कार्यकाल संपला होता. त्यानंतर या पदावर कुणीचीही नियुक्ती (appointed) करण्यात आली नव्हती. सुब्रमण्यम यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर कुणाचीच नेमणूक केली नव्हती. आता ही जबाबदारी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांना देण्यात आली आहे. (Dr V Anantha Nageswaran as the Chief Economic Advisor)


31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला जाणार आहे. तत्पुर्वी केंद्र सरकारने नवीन मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून के. व्ही. सुब्रमण्यम  यांची नियुक्ती केली आहे. 






कोण आहेत नागेश्वरन? - 
डॉ नागेश्वरन यांनी यापूर्वी लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून कार्य केले आहे. त्यांनी भारत आणि सिंगापूर येथील अनेक व्यावसायिक संस्थांमध्ये शिकवले आहे. तसेच त्यांचे विपूल लेखन प्रकाशित आहे. ते आयएफएमआर ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ बिजनेस येथे डिन म्हणून आणि क्रिया विद्यापीठ (Krea University) येथे अर्थशास्त्राचे अर्धवेळ प्राध्यापक असे काम पाहिले आहे. ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे 2019 ते 2021 या काळात अर्धवेळ सदस्य होते. डॉ नागेश्वरन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अहमदाबाद येथून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका प्राप्त केली आहे आणि अमहर्स्ट मॅसेचुसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी पूर्ण केली आहे. डॉ. नागेश्वरन यांनी 1985 मध्ये अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए केले आहे.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live