Anil Ghanwat on Budget : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी  आज देशाचा अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विविध शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी टीका केली आहे. स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी देखील या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हे बजेटचे भाषण नव्हे, तर प्रचार सभा असल्याची टीका घनवट यांनी केली. अनिल घनवट नेमकं काय म्हणाले ते पाहुयात. 


भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्या ऐवजी फक्त सत्ताधारी पक्षाने दहा वर्षात केलेल्या कामांचे गोडवे गायले आहेत. कृषी क्षेत्रातील फक्त डेअरी क्षेत्रापुढे एक गाजराची पेंढी बांधण्या पलिकडे काहीच काहीच उल्लेख नसल्याची टीका अनिल घनवट यांनी केली. बजेटमध्ये केलेल्या तरतुदींवर टीका टाळण्यासाठी काहीच ठोस जाहीर केलेले नाही असे दिसते. लोकसभा निवडणुकीनंतर, जुलैमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर आणखी आघात अपेक्षित आहेत असे दिसते.  अतिशय निराशाजनक अर्थ संकल्प असल्याची टीका घनवट यांनी केली. 


शेतकऱ्यांसह तरुणांची उपेक्षा करणारा अर्थसंकल्प, किसान सभेची टीका


अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 चा सादर केला. सरकार अर्थव्यवस्थेची पूर्वीची आणि आताची स्थिती यावर श्वेतपत्रिका काढणार असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. 2014 मध्ये ज्यावेळी आमच्या सरकारने सत्तेची धुरा सांभाळली त्यावेळी अर्थव्यवस्थेत टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याची आणि शासन प्रणाली व्यवस्थित करण्याची आमच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी होती असे सीतारामन म्हणाल्या. 


लोकांना दिलासा देण्याची, गुंतवणूक आकर्षित करण्याची आणि अतिशय गरजेच्या असलेल्या सुधारणांना पाठबळ देण्याची काळाची गरज होती असे त्या म्हणाल्या. दरम्यान, त्यावेळची अर्थव्यवस्था आणि आताची अर्थव्यवस्था याविषयी बोलताना, अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, अनेक निर्माण झालेल्या संकटांवर मात करण्यात यश आले आहे. सर्वंकष विकासासह अतिशय उच्च शाश्वत वृद्धीच्या कक्षेत अर्थव्यवस्थेला भक्कमपण स्थापित करण्यात आले आहे. 2014 पर्यंत आपण कुठे होतो आणि आता आपण कुठे आहोत? हे पाहाण्यासाठी आणि त्या वर्षांमध्ये केलेल्या गैरव्यवस्थापनांपासून केवळ धडा घेण्यासाठी सरकार अर्थव्यवस्थेची पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यावर सभागृहात श्वेतपत्रिका सादर करेल, अशी घोषणा यावेळी निर्मला सीतारामन यांनी केली.


महत्वाच्या बातम्या:


शेतकऱ्यांसह ग्रामीण आणि बेरोजगार तरुणांची उपेक्षा करणारा अर्थसंकल्प, किसान सभेची जोरदार टीका